Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असून त्यासाठी ती चांगलेच बहाणे सांगत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबई : सध्याच्या कोरोना महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. मात्र, काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा पुन्हा सुरु केल्या जात आहेत. लहान मुलांना पुन्हा एकदा शाळेत जावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल होणाऱा व्हिडीओ तर अगदीच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असून त्यासाठी ती चांगलेच बहाणे सांगत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (little girl refusing to go school funny video went viral on social media)
मुलीला आता शाळेत जावेसे वाटत नाहीये
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी दिसत आहे. कोरोनाची लाट सरल्यामुळे तिची शाळा सुरु झालेली आहे. मात्र, जवळपास वर्षभरापासून घरी बसून लेक्चर केल्यामुळे या मुलीला आता शाळेत जावेसे वाटत नाहीये. तसेच परीक्षेमध्ये गुगलच्या मदतीने पेपर सोडवता येतो म्हणून तिला शाळेचे तास ऑनलाईन पद्धतीने व्हावेत असे वाटते आहे. तसेच परीक्षादेखील ऑनलाईनच व्हायली पाहिजे असे ती म्हणतेय.
शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकली रडतेय
तर दुकरीकडे या मुलीची आई तिला शाळेत जाण्याचे सांगत आहे. लवकरच तुझे क्लास सुरु होणार असून तू तयार हो असे ती म्हणत आहे. शेवटी शाळेत जायला लागणार हे कळून चुकल्यामुळे व्हिडीओतील मुलगी रडत आहे. तसेच माझा श्वास कोंडतो आहे. मला खोकला लागला आहे. मला कोरोना झाल्यासारखे वाटत आहे, असेही मुलगी मजेदारपणे म्हणत आहे.
पाहा व्हिडीओ :
सरकार द्वारा स्कूल खुलने की इजाजत देने की जानकारी मिलते ही…☺️☺️? pic.twitter.com/Tp8zazwoJ6
— Rupin Sharma IPS (@rupin1992) July 23, 2021
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
चिमुकलीचे हे सर्व नाटक तिच्या आईने कॅमेऱ्यात कैद केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडतो आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला नेटकऱ्यांकडून पसंद केले जात आहे. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा आयपीएस अधिकारी Rupin Sharma यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला शेकडो लाईक्स मिळत असून मजेदार कमेंट्स केल्या जात आहेत.
इतर बातम्या :
Video | शॉपिंग मॉलमध्ये अचानकपणे दिला धक्का, आजीबाईंनी माणसाला चांगलाच धडा शिकवला, नेमकं काय केलं ?
Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच !
(little girl refusing to go school funny video went viral on social media)