#Justiceforcabdriver: कॅब ड्रायव्हरला मारणाऱ्या तरुणीविरोधात सोशल मीडियावर रोष, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं ?
तर दुसरीकडे मला माझा सेल्फ रिस्पेक्ट (स्वाभिमान) परत मिळवून द्यावा अशी मागणी कॅब ड्रायव्हरने केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर उठलेल्या वादळानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी व्हिडीओतील तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला भररस्त्यात मारझोड केल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकांनी तरुणीच्या अरेरावीवर रोष व्यक्त करत तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे मला न्याय मिळवून द्यावा द्यावा अशी मागणी कॅब ड्रायव्हरने केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर उठलेल्या वादळानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी व्हिडीओतील तरुणीविरोधात FIR दाखल केला आहे. (Lucknow cab driver, who was slapped by girl demands his self respect back video went viral on social media)
व्हिडीओ समाजमाध्यमावर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली
सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंमुळे वातावरण ढवळून निघतं. सध्या असाच काहीसा प्रकार एका व्हिडीओमुळे झाला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असून यामध्ये एक तरुणी कॅब ड्रायव्हरला भर रस्त्यात मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करत आहेत. तरुणीची ही अरेरावी अनेकांना खटकली आहे. तरुणीवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी लोक करत आहेत. तसेच कॅब ड्रायव्हरला पाठिंबा देण्यासाठी समाजमाध्यमावर #justiceforcabdriver हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगखाली नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
I Want My Self-Respect Back: Ola Cab Driver#lucknow #ArrestLucknowGirl #LucknowGirl #justiceforcabdriver pic.twitter.com/8oaaxUSwCN
— India Trending (@IndiaTrendingin) August 3, 2021
#ArrestLucknowGirl#justiceforcabdriver Every boy after seeing the cab driver that he did not even touch that girl after beaten so much. so that there could be a case against that girl. pic.twitter.com/wP4IaI7cFJ
— Sanjaysid24 (@sanjaysid24) August 2, 2021
Papa ki pari Road pe aa gai he.. Koi leke jao.. Dhum macha rhi he.
Support for taxi driver ?
Justice for cab driver ?#ArrestLucknowGirl#Lucknowpolice#lucknowgirl pic.twitter.com/gLgpaOkh63
— Ajit Kumar maharana (@akmaharana95) August 3, 2021
I Want My Self-Respect Back: Ola Cab Driver#lucknowgirl pic.twitter.com/bguqr3nzjB
— Roshit karnavdiya (@Roshit39295835) August 3, 2021
‘ Woman slapping a cab driver in the middle of a road at Lucknow city’s Awadh crossing ‘
Basic Human Rights of cab driver : pic.twitter.com/bVYuKB8mYP
— Mehnaz Mansoori مہناز (@mehnaz_20) August 2, 2021
मला माझा आत्मसन्मान परत पाहिजे
कॅब ड्रायव्हरला मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच धुमाकूळ उडाला. भर रस्त्यामध्ये कॅब ड्रायवर मार खाताना दिसत असल्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे. परिणामी या प्रकरणात मला न्याय मिळाला पाहिजे. तरुणीवर कारवाई केली जावी अशी मागणी या कॅब ड्रायव्हरने केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
इतर बातम्या :
Video | आजीबाईचा नातवासोबत धडाकेबाज डान्स, मजेदार व्हिडीओ काही क्षणात व्हायरल
(Lucknow cab driver, who was slapped by girl demands his self respect back video went viral on social media)