“ये आम हैं कुछ खास”, 7 आंब्यांच्या सुरक्षेसाठी 4 गार्ड, 6 भनायक श्वान, जाणून घ्या यामागील कारण

मध्य प्रदेशच्या एका शहरात एक अशी बाग आहे जिथे फक्त 7 आंब्यांच्या सुरक्षेसाठी सहा गार्ड आणि 6 भयानक जंगली कुत्रे तैनात करण्यात आले आहेत. हे अनोखे आंबे जबलपूरच्या दोन झाडांवर लागले आहेत.| Madhya Pradesh Four Guards And 6 Wild Dogs Protecting 7 Special Mango In Bhopal Do You Know Why

ये आम हैं कुछ खास, 7 आंब्यांच्या सुरक्षेसाठी 4 गार्ड, 6 भनायक श्वान, जाणून घ्या यामागील कारण
Specia Mango Story
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 12:16 PM

भोपाळ : आपण अनेक अशी ठिकाणं पाहिली असतील जिथे चौवीस तास सुरक्षा असते, सशस्त्र सुरक्षा जवान तैनात राहातात. जी व्यक्ती जेवढी विशेष असते त्याची सुरक्षा जास्त असते. तर काही मौल्यवान गोष्टींच्या सुरक्षेसाठीही मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. पण जर कुठल्या खास नाही एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी सुरक्षा बंदोबस्त तैनात असेल तर नक्कीच आपल्याला आश्चर्य वाटेल. सध्या अशीच एक कहाणी चर्चेत आहे (Madhya Pradesh Four Guards And 6 Wild Dogs Protecting 7 Special Mango In Bhopal Do You Know Why).

एका रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशच्या एका शहरात एक अशी बाग आहे जिथे फक्त 7 आंब्यांच्या सुरक्षेसाठी सहा गार्ड आणि 6 भयानक जंगली कुत्रे तैनात करण्यात आले आहेत. हे अनोखे आंबे जबलपूरच्या दोन झाडांवर लागले आहेत. या दोन झाडांवरील 7 आंब्यांची सुरक्षा यासाठी केली जात आहे कारण ते एका विशिष्ट जातीचे आंबे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे आंबे भारतात दुर्मिळ आहेत. यांची किंमत ऐकून तुम्ही बोट तोंडात घालाल.

हे जपानचे खास आंबे ताईयो नो तमागो आहेत. याचं वजन 900 ग्राम पर्यंत असते. हे जगातील सर्वात महाग आंबे आहेत. संकल्प परिहार आणी राणी परिहार हे जोडपे या खास आंब्यांची शेती करतात. गेल्यावर्षी या आंब्याची किंमत 2 लाख 70 हजार प्रती किलो होती, असं त्यांनी सांगितलं. राणी परिहार यांनी सांगितलं की जेव्हा या आंब्यांच्या किंमतीबाबत लोकांना माहिती झालं तेव्हा तेव्हा चोर बागेत आंबे चोरण्यासाठी पोहोचले आणि झाडावरुन दोन आंबे चोरुन नेले. त्यामुळे आम्ही या आंब्यांच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

या आंब्यासाठी मोठी किंमत द्यायला अनेकजण तयार आहेत, पण आम्ही हे न विकण्याचा निर्णय घेतला आहे, असं राणी परिहार यांनी सांगितलं. रोपांच्या खरेदीसाठी चेन्‍नई जात होतो तेव्हा एका प्रवाश्याने आम्हाला हे रोप दिलं आणि म्हटलं की यांचं आपल्या मुलांप्रमाणे संगोपन कराल. तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की हे जगातील सर्वात खास आंब्याचं रोप आहे. त्यामुळे आम्ही याला सामान्य रोप समजून बागेत लावलं. पण जेव्हा या झाडावर आंबे लागले तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो, कारण ते लाल रंगाचे होते. मग आम्ही या खास आंब्याची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्हाला याची किंमत माहिती झाली, असंही त्यांनी सागितलं.

Madhya Pradesh Four Guards And 6 Wild Dogs Protecting 7 Special Mango In Bhopal Do You Know Why

संबंधित बातम्या :

Video | पक्ष्यांच्या हल्ल्यामध्ये मांजर हतबल, शेवटी पळ काढला, पाहा मजेदार व्हिडीओ

Video | प्रसिद्धी मिळवण्याची तरुणाला भारीच हौस, समोरुन दुचाकी येताच थेट तलावात पडला, पाहा व्हिडीओ

Video | नवा शेखचिल्ली ! एका क्षणात झाड तोडलं, नंतर जे झालं ते एकदा पाहाच

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.