VIDEO : आधी बेडूक उड्या, नंतर नागिन डान्स, लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांकडून अनोखी शिक्षा, व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेशात पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना अनोखी शिक्षा दिली आहे. या संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Viral Video of Police Punishment).
मुंबई : जोपर्यंत घरापर्यंत कोरोना पोहोचत नाही, तोपर्यंत अनेकांना परिस्थितीचं गांभीर्य येत नाही, अशीच काहिशी परिस्थिती आपल्या देशात आहे. अनेक नागरिक अजूनही कोराना महामारीच्या संकटाला गांभिर्याने घेताना दिसत नाही. पण पोलीस आपली जबाबदारी अतिशय चोखपणे राबवत आहेत. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस आधी विनंती करुन घरात राहण्याचे आवाहन करतात. त्यानंतर तरीही नागरिकांनी ऐकलं नाही तर त्यांना दंडुक्याचा प्रसाद देतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, मध्य प्रदेशात पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना अनोखी शिक्षा दिली आहे. या संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Viral Video of Police Punishment).
नेमकी शिक्षा काय?
मध्य प्रदेशच्या दंतिया आणि भिंड जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी बेडूक उड्या मारण्याची आणि नागिन डान्स करण्याची शिक्षा दिलीय. दंतिया जिल्ह्यातील राजगड चौकावर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना आधी उठाबशा काढायला लावले. त्यानंतर त्यांच्याकडून बेडूक उड्या आणि नागिन डान्स करवून घेतलं. नंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढून सोडून दिलं. पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. काही लोक याबाबतचा व्हिडीओ बघून पोलिसांवरही टीका करत आहेत (Viral Video of Police Punishment).
पोलिसांची नेमकी भूमिका काय?
याप्रकरणी राजगढचे पोलीस अधिकारी वाय एस तोमर यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही वारंवार आवाहन करुनही लोक घराबाहेर पडत आहेत. मात्र, ते ऐकत नसल्याने अनेकांना उठाबशा घायला लावल्या. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना राम नाव लिहायला लावलं, काही लोकांना कोंबडा बनायला लावलं, काहिंची तर आरती केली तर काहींना जेलमध्ये पाठवलं, अशा शिक्षा आम्ही दिल्या”, असं त्यांनी सांगितलं.
व्हिडीओ बघा :
Baraatis made to do frog jump by cops in Umri area of MP’s Bhind district. Despite ban on marriages entire May, over 100 villagers had come for marriage in Bhind district. Case also lodged against all concerned, including groom. @NewIndianXpress@khogensingh1 @gsvasu_TNIE pic.twitter.com/uPRoAOipVY
— Anuraag Singh (@anuraag_niebpl) May 20, 2021
नागरिकांना अजूनही परिस्थितीचं गांभीर्य नाही
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने देशातील काही राज्यांमध्ये सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या महामारीच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणं जास्त जरुरीचं आहे. मात्र, काही नागरिक अजूनही परिस्थितीला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. ते विनाकारण घराबाहेर फिरताना दिसतात. त्यामुळे मध्य प्रदेशात अशा लोकांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या कारवाईचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
हेही वाचा : VIDEO : चिमुकलीचे अपहरणकर्त्याशी दोन हात, नराधमाला जमिनीवर पाडलं, घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल