Magawa Rat | आतापर्यंत वाचवले हजारो लोकांचे प्राण, सुरुंग शोधणारा Magawa उंदीर अखेर निवृत्त

तब्बल 71 सुरुंग तसेत इतर कित्येक स्फोटकं शोधून काढणारा मागवा (Magawa) नावाचा उंदीर निवृत्त झाला आहे. (magawa hero rat retires cambodia)

Magawa Rat | आतापर्यंत वाचवले हजारो लोकांचे प्राण, सुरुंग शोधणारा Magawa उंदीर अखेर निवृत्त
Magawa Rat
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 9:07 PM

कंबोडिया: तब्बल 71 सुरुंग तसेत इतर कित्येक स्फोटकं शोधून काढणारा मागवा (Magawa) नावाचा उंदीर निवृत्त झाला आहे. आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीमध्ये त्याने ही कामगिरी करुन दाखवली आहे. मात्र, आता वयोमानानुसार तो थकला असून त्याची सुरुंग शोधण्याची शक्ती कमी होऊ लागली आहे. याच कारणामुळे हा उंदीर आता सेवेतून निवृत्त झाला आहे. (Magawa hero rat retires from job who detect Landmines in Cambodia)

मिळालेल्या माहितीनुसार मागवा या उंदराला नोंदणीकृत असलेल्या अपोपो (Apopo) नावाच्या चॅरिटने प्रशिक्षण दिले आहे. ही संस्था टांझानिया येथील असून तिने आतापर्यंत अशा अनेक उदरांना वाढवले आणि प्रशिक्षित केले आहे. प्रशिक्षित केलेल्या उंदरांना ही संस्था हिरो रॅट म्हणून संबोधते. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी या संस्थेकडून उंदरांना 1990 सालापासून प्रशिक्षण दिले जाते.

उंदराने आतापर्यंत कित्येकांना वाचवलं

मागवा हा उंदीर सध्या निवृत्त झाला आहे. या उंदराविषयी सांगताना त्याला दिशानिर्देश देणाऱ्या मालेन (Malen) यांनी अधिक माहिती दिली आहे. “मागवाने आतापर्यंत अत्यंत चांगले काम केले. त्याने फत्ते केलेल्या सर्व मोहिमा या अतुलनीय होत्या. मी त्याच्यासोबत काम केल्याचा मला अभिमान आहे,” असे मालेन म्हणाल्या. तसेच मागवा हा दिसायला लहान असला तरी त्याने आतापर्यंत अनके लोकांचा जीव वाचवल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सुरुंगावरुन चालला तरी स्फोट नाही

मागवा या उंदाराचे वजन 1.2 किलो असून तो फक्त 70 सेंटीमिटर लांब आहे. त्याची विशेषता सांगायची झाल्यास हा उंदीर इतर उंदरांच्या जातीपेक्षा हलका आहे. त्याच्या याच गुणधर्मामुळे त्याने अनेक माणसांचे जीव वाचवले आहेत. मागवा हा उंदीर एखाद्या सुरुंगावरुन चालला तरी स्फोट होत नाही. तसेच धातूचा कचरा टाळून त्यामधून सुरुंग शोधण्याची कला या उंदराला अवगत आहे. त्याची काम करण्याची क्षमता सांगायची झाल्यास एका टेनिस कोर्टएवढ्या मैदानातून तो अवघ्या 20 मिनिटांमध्ये सुरुंग शोधू शकतो.

दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मागवाला PDSA संस्थेने सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं होतं. मागील 77 वर्षांमध्ये मागवा हा असा एक उंदीर आहे ज्याला हा सन्मान मिळाला होता.

इतर बातम्या :

Video | बिबट्याची थेट पाण्यात उडी, एका सेकंदात मगरीची शिकार, पाहा थरारक व्हिडीओ

VIDEO | लाडक्या माहूताच्या निधनाने हत्तीलाही शोक, पार्थिवासमोर सोंडेने अखेरचा निरोप, पाहा हृदयद्रावक व्हिडीओ

PHOTO | या फोटोंनी जिंकला नेचर फोटोग्राफी पुरस्कार 2021, पहा प्राणी आणि निसर्गाची अनोखी जुगलबंदी

(Magawa hero rat retires from job who detect Landmines in Cambodia)

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.