Video: आधी दुधात शिजवली, नंतर त्यावर चॉकलेट ओतले, मॅगीची वाट लावणारी रेसिपी पाहून नेटकरी भडकले!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक मुलगी मॅगीचा फॅमिली पॅक उघडते आणि ते बनवण्यासाठी पॅनमध्ये ठेवते, पण ती ही मॅगी पाण्यात नाही तर दुधात शिजवते

Video: आधी दुधात शिजवली, नंतर त्यावर चॉकलेट ओतले, मॅगीची वाट लावणारी रेसिपी पाहून नेटकरी भडकले!
दूध आणि चॉकलेटसोबत बनवलेली मॅगी
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 1:06 PM

2 मिनिटांत तयार होणारी मॅगी ही आपल्या देशाची राष्ट्रीय डिश… मॅगी आवडत नाही असा शोधून सापडत नाही. पण मॅगीसोबत जेव्हा प्रयोग केले जातात, तेव्हा ती मॅगी अनेकदा नकोशी वाटते. अशाच एका प्रयोगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एका मुलीने मॅगीसोबत जे काही केलं, ते पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. अनेकांना ही मॅगी खाऊही वाटणार नाही. त्यामुळेच अनेकजण या रेसिपीवर चिडलेले पाहायला मिळत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक मुलगी मॅगीचा फॅमिली पॅक उघडते आणि ते बनवण्यासाठी पॅनमध्ये ठेवते, पण ती ही मॅगी पाण्यात नाही तर दुधात शिजवते आणि मसाल्यांच्या ऐवजी त्यात ती चॉकलेट सिरप टाकते. मॅगी तयार झाल्यावर ती पुन्हा त्यावर चॉकलेट सिरप टाकते. व्हिडिओमध्ये ती असे म्हणते की, “याची चव खूपच खराब आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Anjali Dhingra (@sooosaute)

फूड ब्लॉगर अंजली धिंग्राने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही अजब रेसिपी पाहिल्यानंतर लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘कोण आहेत हे लोक, कुठून येतात हे लोक..! दुसरीकडे, हा प्रयोग पाहिल्यानंतर दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हे पाहिल्यानंतर मला सूर्यवंशमच्या खीरची आठवण झाली.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याआधीही मॅगीचे अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. ज्यामध्ये एका व्यक्तीने ‘फंटा कोल्ड ड्रिंक’मध्ये मॅगी बनवली होती. ज्यामध्ये दुकानदाराने कढईत तूप टाकतो आणि नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि टोमॅटोचे चॉपिंग टाकतो. मग विक्रेता पॅनमध्ये ‘फंटा’ कोल्ड्रिंकची पूर्ण बाटली ओततो. मॅगी, मसाला, हळद, धणे आणि मीठ उकळत्या फंटामध्ये मिसळले जातात. मॅगी फँटा सुकायला लागल्यावर त्यावर चाट मसाला आणि लिंबू मसाला घालून सर्व्ह करतात.

हेही वाचा:

तुम्हाला दिसणारा हा पारवा नाही, तर हा आहे…, व्हिडीओ पाहा आणि जाणून घ्या!

Video: पाणी पिण्यासाठी म्हशीने चक्क हापशाचा वापर केला, नेटकरी म्हणाले, आता सांगा, अक्ल बडीं या भैस!

 

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.