आयआयटी मुंबईतून इंजीनिअर, लाखोचं पॅकेज नाकारलं; कुंभमेळ्यातील हायेस्ट एज्युकेटेड साधूची का होतेय चर्चा?
आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतलं, आता सगळं सोडून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभात सहभागी झाला इंजिनियर तरुण. नाव अभय सिंग. अभय यांनी आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर मास्टर इन डिझाईनचे शिक्षण घेऊन फोटोग्राफर बनले. पद, पैसा असतानाही साधू बनावं का वाटलं? हेच जाणून घ्या.
पद, पैसा सोडून एक आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतलेला इंजिनियर थेट महाकुंभात सहभागी झाला. तेही साधू बनून. आयआयटी बाबा असं त्याला म्हणतात. अभय सिंग हे त्याचं पूर्ण नाव. एका मुलाखतीत अभय यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, त्यांनी आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर मास्टर इन डिझाईनचे शिक्षण घेऊन फोटोग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तसेच ते कोचिंगमध्ये फिजिक्स शिकवत होते. पण, सध्या हे सगळं सोडून ते महाकुंभात सहभाही आहेत.
महाकुंभमेळा 2025 मध्ये येणारे साधू-बाबाही आपल्या प्रापंचिक आयुष्यातून आध्यात्मिक जागृतीपर्यंतचा अनोखा प्रवास करत आहेत. अशाच एका बाबाने यापूर्वी अमेरिकन लष्करात सेवा केल्याचे सांगितले होते, तर दुसऱ्या बाबाने म्हणजे आम्ही सांगत असलेल्या अभय सिंग यांनी एरोस्पेस इंजिनीअरिंग तसेच फोटोग्राफीमधील कारकीर्द सोडून अध्यात्माचा मार्ग अवलंबला आहे.
मसानी गोरख या नावाने ओळखले जाणारे अभय सिंग आयआयटी मुंबईमधून शिकले आणि नंतर बाबा होण्यापूर्वी ‘लाइक थ्री इडियट्स’ या फोटोग्राफीकडे वळले.
अभय सिंग किंवा आयआयटी बाबा म्हणाले की, ते हरियाणाचे आहेत आणि नंतर ते मुंबईला गेले आणि पदवीच्या काळात चार वर्षे तेथे राहिले.
अभय सिंग साधू कसे बनले?
जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी सॉक्रेटिस आणि प्लेटो आणि उत्तर-आधुनिकतावादासारख्या तत्त्वज्ञानात्मक संकल्पना वाचायला सुरुवात केल्याचे सिंग यांनी सांगितले. “हेच खरे ज्ञान आहे हे मला आता समजले आहे. मनाला किंवा मानसिक आरोग्याला समजून घ्यायचं असेल तर ते (अध्यात्माद्वारे) करू शकता,’ असं अभय म्हणाला. सिंग पुढे म्हणाले की, “हा टप्पा सर्वोत्तम टप्पा आहे.”
महाकुंभमेळामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमात डुबकी मारण्यासाठी सुमारे 42 कोटी लोक प्रयागराजमध्ये येण्याची शक्यता आहे. 144 वर्षांतील हा क्षण असल्याने संगम पाहण्यासाठी नागा साधूंसह अनेक साधू प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत.
प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. प्रयागराजमध्ये दुर्मीळ महाकुंभ सुरू आहे. हा मेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, यावेळी तो अधिक विशेष आहे, कारण 144 वर्षांनंतर होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.