VIDEO : ‘विजय वडेट्टीवार आमच्यासाठी देव’, दारुबंदी उठल्यामुळे चंद्रपुरात बारमालकाकडून पूजा, व्हिडीओ व्हायरल

राज्य सरकारने चंद्रपुरात दारुबंदी उठवल्यामुळे मद्यप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं आहे (Maharashtra Minister Vijay Wadettiwar photo worshipped by bar owner after liquor ban lifted in Chandrapur).

VIDEO : 'विजय वडेट्टीवार आमच्यासाठी देव', दारुबंदी उठल्यामुळे चंद्रपुरात बारमालकाकडून पूजा, व्हिडीओ व्हायरल
'विजय वडेट्टीवार आमच्यासाठी देव', दारुबंदी उठल्यामुळे चंद्रपुरात बारमालकाकडून पूजा, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 9:39 PM

चंद्रपूर : लोक आनंद कशाप्रकारे व्यक्त करतील याचा काहीच भरोसा नाही. चंद्रपुरात तर आनंद व्यक्त करायची हद्दच झाली. चंद्रपूर जिल्ह्यात 6 वर्षांनी दारुविक्रीवरील बंदी हटली आहे. त्यामुळे बारमालक आणि मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा हा आनंद आता एका व्हिडीओतून समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक बारमालक चक्क चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करताना दिसत आहे (Maharashtra Minister Vijay Wadettiwar photo worshipped by bar owner after liquor ban lifted in Chandrapur).

संबंधित व्हिडीओ चंद्रपुरातील ग्रीन पार्क बारमधला

राज्य सरकारने चंद्रपुरात दारुबंदी उठवल्यामुळे मद्यप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं आहे. या आनंदात एक बारमालक तर थेट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करत आहे. त्याने आपल्या बारमध्ये विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावला आहे. त्या फोटोची बारमालक आरती करत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ हा चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधाला असल्याचं उघड झालं आहे.  (Maharashtra Minister Vijay Wadettiwar photo worshipped by bar owner after liquor ban lifted in Chandrapur).

‘विजय वडेट्टीवार आमच्यासाठी देवच’

विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करणारे बारमालक गणेश गोरडवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार हे आमच्यासाठी देव आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. “शहरात पुन्हा आनंद आला आहे. विजय भाऊंनी खूप चांगलं काम केलं आहे. आम्हाला त्यांच्या कामाबद्दल इतका आनंद झाला की आम्ही थेट त्यांच्या फोटोची आरती केली. कारण ते आजच्या परिस्थितीत आमच्यासाठी देवच ठरले आहेत. जो आमचं पोट भरतो तोच आमचा देव. जे मद्यविक्रेते आहेत त्यांच्या सगळ्यांची एकच भावना होती. आम्ही सगळे विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार होतो. त्यांची खूप मेहरबानी आहे. त्यांच्यामुळे चंद्रपुरात खुशीयाली आली”, असं बारमालक म्हणाले.

दारुबंदी उठवल्यानंतर पहिल्या 3 दिवसात 1 कोटींच्या मद्याची विक्री

चंद्रपुरात पुन्हा एकदा 750 बार-रेस्टॉरंट सुरु झाले आहेत. दारुबंदी उटळ्यानंतर पहिल्या 3 दिवसात मद्यप्रेमींनी 1 कोटींची दारु रिचवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर गेली 6 वर्षे अत्यंत तोट्याची गेली, अशी भावना बारमालकांनी व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवून मद्य व्यावसायिक, बारमालक, त्यावर आधारित रोजगार यांना चालना दिली आहे. विजय वडेट्टीवार यांचे हे उपकार कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया बारमालकांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करत असल्याचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

Video | लाल रंगाच्या साडीमध्ये महिलेचा धडाकेबाज डान्स; हावभाव, ठुमक्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

VIDEO : नवरदेवाने हात पुढे केला, भर मंडपात नवरीने जे केलं ते लोक बघतच राहिले

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.