याचं कौशल्य पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही झाले फॅन!

आनंद महिंद्रा यांना तुम्ही ओळखत असालच. ते देशातील नावाजलेले उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आहेत. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून ते सोशल मीडियावर बराच वेळ घालवतात आणि वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. कधी कधी त्यांचे व्हिडिओ लोकांना अनेक गोष्टी शिकवून जातात.

याचं कौशल्य पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही झाले फॅन!
Anand mahindra loves this videoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 7:54 PM

मुंबई: जगात प्रतिभेची कमतरता नाही. असे लोक आहेत जे आपल्या प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित करतात, आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. तसं तर प्रत्येकाकडे वेगळ्या प्रकारचं कौशल्य असतं. काहींमध्ये गायनाची तर काहींमध्ये नृत्याची प्रतिभा आहे. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने आपल्या गायनाच्या प्रतिभेने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. खरं तर या व्यक्तीने एक-दोन नव्हे तर पंजाबी, गुजराती आणि तमिळ, तेलुगूसह एकूण 7 भाषांमध्ये केसरिया गायलं आहे. त्या व्यक्तीचं हे कौशल्य पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही फॅन झाले आहेत.

आनंद महिंद्रा यांना तुम्ही ओळखत असालच. ते देशातील नावाजलेले उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आहेत. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून ते सोशल मीडियावर बराच वेळ घालवतात आणि वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. कधी कधी त्यांचे व्हिडिओ लोकांना अनेक गोष्टी शिकवून जातात. काही व्हिडिओ लोकांचे मनोरंजनही करतात. सध्या त्यांनी शेअर केलेला व्हिडिओही खूप मनोरंजक आणि भन्नाट आहे.

व्हिडिओमध्ये एक पंजाबी व्यक्ती ‘केसरिया’ हे गाणे आधी मल्याळम, नंतर पंजाबी, नंतर तेलुगू, नंतर तमिळ, कन्नड, गुजराती आणि शेवटी हिंदीत गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये स्विच होताना त्याचा सूर अजिबात हलत नाही. ते गाणं जणू त्याच भाषेत बनवलं आहे, अशा प्रकारे तो प्रत्येक भाषेत गाणं गातो. यालाच खरी प्रतिभा म्हणतात.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा शानदार व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या व्यक्तीकडे खरोखरच भाषा कौशल्य आहे, त्याचा आवाज ऐकणे खूप दिलासादायक आहे. एक मिनिट 25 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 36 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 18 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक करत विविध कमेंट्सही केल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.