Video | वाघ तो वाघच! Mahindra Xyloला दातांनीच ओढलं, आनंद महिंद्रांना का नवल नाही वाटलं?
दरम्यान हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली आहे. झायलो कारचा बंपर चावणाऱ्या या वाघाचं वागणं पाहून, मला जराही आश्चर्य वाटलं नाही, अशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रा यांनी दिली आहे.
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आपल्या ट्विटर (Tweeter) हॅन्डलवरुन वारंवार इंटरेन्स्टिंग व्हिडीओ (Interesting Video) शेअर करत असतात. आताही त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एक वाघ (Tiger) चक्क महिंद्राचीच झायलो (Mahindra Xylo) की कार चक्क दातानं ओढताना कॅमेऱ्यात (Camera) कैद झाला आहे.
कुठला व्हिडीओ?
ऊटी ते म्हैसूर मार्गावर ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका प्रवाशानं ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. थेप्पाकडूजवळ एका रस्त्यावर चक्क वाघानं एक झायलो कार अडवली. नुसती ही कार वाघानं अडवलीच नाही, तर तिला आपल्या धारधार दातांत अडकवून मागंही खेचलंय. या सगळा प्रकार पाहून अनेकांना घाम फुटलाय.
वाघ जेव्हा की कार दातानं ओढत होता, तेव्हा झायलो कारमधील प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली होती. कारमध्ये त्यांनी एकच आरडाओरडा करायला सुरुवात केली. झायलो कारच्या मागच्या बाजूला असलेल्या बंपर वाघानं दातानं फाडला. त्यानंतर आपल्या दातामध्ये फाडलेल्या बंपरचा भाग घट्ट पकडून वाघ ही कार मागे खेचू लागला. अक्षरशः ब्रेक मारत चालकाला वाघाला रोखावं लागलं होतं. सुदैवानं काय झायलो कारच्या खिडक्यांना सुरक्षाकवच लावण्यात आलं होतं.
‘म्हणून नवल वाटलं नाही’
दरम्यान हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली आहे. झायलो कारचा बंपर चावणाऱ्या या वाघाचं वागणं पाहून, मला जराही आश्चर्य वाटलं नाही, अशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रा यांनी दिली आहे. इतकंच काय तर महिंद्राच्या कार या चविष्ट असल्याचं माझा अनुभव वाघालाही आला असल्याचं आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय.
पाहा व्हिडीओ –
हा संपूर्ण दीड मिनिटांचा थरार आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे आहे. अडीच मिनिटांचा हा व्हिडीओ आतापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून अडीच हजारेपक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर 26 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय.
Going around #Signal like wildfire. Apparently on the Ooty to Mysore Road near Theppakadu. Well, that car is a Xylo, so I guess I’m not surprised he’s chewing on it. He probably shares my view that Mahindra cars are Deeeliciousss. ? pic.twitter.com/A2w7162oVU
— anand mahindra (@anandmahindra) December 30, 2021