गावातली जमीन माकडांच्या नावावर! थोडी थोडकी नाही, तब्बल 32 एकर
ही जमीन माकडांच्या मालकीची आहे, असे कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे नमूद आहे. ही तरतूद कोणी आणि केव्हा केली हे माहित नाही.
जमिनीचे वाद लोकांमध्ये सर्रास सुरू असतात महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील माकडांना 32 एकर जमीन नावावर करण्याचा दुर्मिळ मान देण्यात आला आहे. उस्मानाबादच्या उपळा गावात ही माकडं कुणाच्या तरी दारात पोहोचतात, तेव्हा त्यांना खूप मान मिळतो. इतकंच नाही तर काही वेळा लग्नसमारंभातही त्यांना मान दिला जातो. उपळा ग्रामपंचायतीकडे सापडलेल्या भूमी अभिलेखात 32 एकर जमीन गावात राहणाऱ्या सर्व माकडांच्या नावावर असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.
“ही जमीन माकडांच्या मालकीची आहे, असे कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे, परंतु प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी आणि केव्हा केली हे माहित नाही.” असे सांगून गावाचे सरपंच बाप्पा पडवळ म्हणाले की, पूर्वी गावात केल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये माकडांचा समावेश होता.
पडवळ म्हणाले की, या गावात आता सुमारे 100 माकडांचे वास्तव्य आहे आणि प्राणी जास्त काळ एकाच ठिकाणी राहत नसल्यामुळे गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या कमी झाली आहे.
वनविभागाने या जागेवर वृक्षारोपणाचे काम केले असून या भूखंडावर एक बेवारस घरही होते, ते आता कोसळले आहे, असे ते म्हणाले. “पूर्वी जेव्हा जेव्हा गावात लग्नं व्हायची, तेव्हा आधी माकडांना भेटवस्तू दिल्या जात असत आणि त्यानंतरच हा सोहळा सुरू व्हायचा.
आता प्रत्येकजण या प्रथेचे पालन करत नाही,” ते पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा माकड त्यांच्या दारात येतात, तेव्हा गावकरीही माकडांना खायला घालतात. “त्यांना कोणीही खाण्यास मनाई करत नाही.