Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ‘प्रॉमिस डे’ला तुमच्या पालकांना करा हे प्रॉमिस, पालकांसोबतचे नाते होईल अधिक घट्ट

प्रॉमिस डे हा केवळ प्रियकर आणि प्रियसी साठीच नाही तर त्या सर्व लोकांसाठी आहे जे आपल्या आयुष्यात खास आहेत. आई वडील हे आयुष्यामध्ये सर्वात जास्त खास असतात. त्यामुळे या प्रॉमिस डे च्या दिवशी तुमच्या पालकांना काही प्रॉमिस आवश्यक करा आणि तुमचे नाते अधिक घट्ट करा.

या 'प्रॉमिस डे'ला तुमच्या पालकांना करा हे प्रॉमिस, पालकांसोबतचे नाते होईल अधिक घट्ट
promise dayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 11, 2025 | 1:58 PM

व्हॅलेंटाईन वीक मध्ये 11 फेब्रुवारीला साजरा होणारा प्रॉमिस डे हा केवळ कपल साठीच नाही तर प्रत्येक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. सर्वजण या दिवशी आपल्या प्रियकर किंवा प्रियसीला प्रॉमिस करतात. परंतु हा दिवस आणखीन खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांना काही महत्त्वाचे प्रॉमिस करू शकता. आई वडील हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहेत. लहानपणापासून ते शेवटपर्यंत ते आपल्या सुखदुःखात निस्वार्थपणे उभे असतात. आई-वडील आपल्या मुलांवर निस्वार्थपणे प्रेम करतात आणि आपल्या चांगल्या भविष्यासाठी शक्य असेल तर सर्व करतात.

आई-वडिलांप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन त्यांचे जीवन आनंदी करण्यासाठी काही महत्त्वाचे प्रॉमिस त्यांना करणे हे कर्तव्य आहे. या प्रॉमिस डे ला तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काही खास प्रॉमिस करू शकता.ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल. त्यासोबतच त्यांचे तुमच्या सोबत असलेले नाते आणखीन घट्ट होईल.

आई-वडिलांचा नेहमी आदर करा

आई-वडिलांनी आपल्याला जीवन दिले, संस्कार दिलेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम केले. त्यांचा आदर करणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांना कधीही एकटे वाटू न देणे

अनेक वेळा धावपळीच्या आयुष्यात आपण इतके व्यस्त होतो की आपल्याला पालकांसोबत वेळ घालवणे कठीण होते. या खास दिवशी त्यांना प्रॉमिस करा की तुम्ही कितीही व्यस्त असला तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध असणार आणि त्यांना कधीही एकटेपणाची जाणीव होऊ देणार नाही.

स्वप्न आणि इच्छांची काळजी

अनेकदा आपले पालक मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आनंदाचा आणि स्वप्नांचा त्याग करतात त्यांना आजच्या दिवशी प्रॉमिस करा की आता तुम्ही त्यांच्या इच्छा आणि स्वप्नांची काळजी घ्याल आणि ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न कराल.

आरोग्याची काळजी घ्याल

वाढत्या वयानुसार पालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. तुम्ही त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहाल, त्यांना वेळेवर डॉक्टरांकडे घेऊन जाल आणि त्यांची औषधे त्यासोबतच आहाराची पूर्ण काळजी घ्या हे प्रॉमिस आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या पालकांना अवश्य करा.

प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासोबत राहाल

लहानपणापासून ते आजपर्यंत प्रत्येक प्रसंगात पालक मुलांची साथ देत असतात. त्याचप्रमाणे आता प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहून त्यांना कधीही एकटे पडू न देणे ही आपली जबाबदारी आहे.

नाराज न होता त्यांचे ऐकणार

अनेक वेळा पालक आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात पण आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांना प्रॉमिस करा की ते जे काही बोलतात ते तुम्ही शांतपणे ऐकाल आणि ते जे बोलतील ते तुमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे याची जाणीव त्यांना करून द्या.

त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल

छोट्या छोट्या गोष्टी देखील पालकांना आनंद देऊ शकतात. त्यांच्यासोबत वेळ घालवणे, त्यांच्या आवडत्या वस्तू खरेदी करणे, आणि त्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस खास बनवणे. यासारख्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्याल असे प्रॉमिस त्यांना करा.

जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'.
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी.
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा.