दोन बायका असू शकतात! आर माधवनने सांगितली ‘अब्दुल’ची कहाणी, हर्ष गोएंका जबरदस्त हसले
त्यावर अब्दुलने खूप संयमाने उत्तर दिले, "डॉक्टर, मी तुमच्याशी सहमत आहे पण पुरुषाला दोन बायका असू शकतात ना? आर. माधवनचा मजेशीर किस्सा, शेवट जबरदस्त!
हर्ष गोएंका यांना कोण ओळखत नाही? आपल्या बिझी लाईफस्टाईलमधून थोडा वेळ काढून सोशल मीडियावरही वेळ घालवणारा तो देशातील नावाजलेला बिझनेसमन आहे. अनेकदा ते वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेअर करत असतात. कधी त्यांच्या पोस्ट लोकांना जगण्याची पद्धत शिकवतात, तर कधी त्यांच्या पोस्ट लोकांना हसवतात. सध्या त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर युजर्स अक्षरशः हसून हसून वेडे झालेत. ते स्वत:ही खूप हसले आहेत. त्यांची ही पोस्ट खरंतर खूप मजेशीर गोष्ट आहे. यात बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आर. माधवन याने एक भन्नाट गोष्ट सांगितलीये.
ही गोष्ट प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर आणि मिस्टर अब्दुल यांची आहे. आर माधवन कथेची सुरुवात अशा प्रकारे करतो की एकदा मिस्टर अब्दुल डॉक्टरांकडे गेला आणि त्याला म्हणाला की त्याच्या पत्नीच्या पोटात तीव्र वेदना होत आहेत, ज्यामुळे ती ना बसू शकते, ना उठू शकते ना झोपू शकते.
तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून अब्दुलला तुमच्या पत्नीला अपेंडिक्स असल्याचे सांगितले. यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून अपेंडिक्स काढून टाकले. तेव्हा अब्दुल खुश झाला आणि बायकोला घेऊन घरी गेला.
वर्षभरानंतर तो पुन्हा डॉक्टरांकडे आला आणि म्हणाला की त्याच्या बायकोला अपेंडिक्स आहे, तुम्ही तिचं ऑपरेशन करून द्या. यावर डॉक्टरांनी आधी तापासणी करू, त्यानंतरच काही सांगू शकेन, असे सांगितले, पण अब्दुल मान्य करायला तयार नव्हता. त्यांचा मुद्दा एवढाच होता की, अपेंडिक्स आहे, तुम्ही फक्त ऑपरेशन करून ते काढून टाका.
अब्दुलचा आग्रह पाहून डॉक्टर संतापले आणि म्हणाले की, एका व्यक्तीला एकच अपेंडिक्स आहे आणि मी ते तुझ्या बायकोच्या पोटातून काढून टाकले आहे. त्यावर अब्दुलने खूप संयमाने उत्तर दिले, “डॉक्टर, मी तुमच्याशी सहमत आहे की प्रत्येक माणसाला एकच अपेंडिक्स असतं, पण पुरुषाला दोन बायका असू शकतात ना?
??? pic.twitter.com/2UidDPWuyj
— Harsh Goenka (@hvgoenka) February 4, 2023
हर्ष गोएंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर आर. माधवनचा हा मजेशीर किस्सा व्हिडिओ शेअर केला आहे. एक मिनिट 42 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे की ही एक गमतीशीर कथा आहे, तर कोणी म्हणत आहे की त्याचा शेवट जबरदस्त आहे.