Video: बाईकवर स्टंट करायला गेला, आणि तोंड फोडून बसला, अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याने दुचाकीवरून जाताना दिसत आहे. पण अचानक हा व्यक्ती गाडीचं पुढचं चाक हवेच उचलतो आणि वाहतुकीच्या रस्त्यावर जोरात गाडी पळवतो.

Video: बाईकवर स्टंट करायला गेला, आणि तोंड फोडून बसला, अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर
बाईकस्वाराचा स्टंट आणि अपघात
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 3:03 PM

अनेकदा तुम्ही लोकांना रस्त्यावर धोकादायक स्टंट करतानाही पाहिले असेल. खरं म्हणजे जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणारे हे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे करत असतात. पण स्टंट दाखवण्याच्या प्रक्रियेत ते हे विसरतात की असं करणं त्याच्या जीवावरही बेतू शकतं. अशाच स्टंटबाजीमुळे अनेकांनी जीव गमवला आहे. पण काही लोक असे असतात की, त्यांना अशा गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. (Man doing stunt bike then what happened watch viral video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याने दुचाकीवरून जाताना दिसत आहे. पण अचानक हा व्यक्ती गाडीचं पुढचं चाक हवेच उचलतो आणि वाहतुकीच्या रस्त्यावर जोरात गाडी पळवतो. काही सेकंदांपर्यंत ही गाडी तो दामटवत राहतो. पण तितक्यात त्याचा तोल सुटतो आणि त्यानंतर जे होतं ते पाहिल्यानंतर असे स्टंट किती धोकादायक असू शकतात हे समजतं.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ पाहून अनेकजण घाबरले. आता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘असं करू नका, हिरोपंती कामी येत नाही’. हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी वेगाने आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, तुमचाही असाच काहीसा हेतू असेल तर हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा. त्याचवेळी आणखी एका व्यक्तीने लिहिले की, मला वाटते की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे समजले पाहिजे की, रस्ता आणि वाहन हे तुमच्या खेळाचं मैदान नाही.

इंटरनेटच्या दुनियेत दररोज असे व्हिडीओ शेअर केले जात आहेत, ज्यांना पाहून धक्का बसतो. हा व्हिडिओ शेअर करून लोकांनी लिहिले की, रस्त्यावर असे पराक्रम कुणाचाही जीव घेऊ शकतात. त्यामुळेच अशी कृत्ये रस्त्यावर करू न केलेलीच बरं.

हेही पाहा:

Video: लाहौरच्या रस्त्यावर शहामृगाची रेस, नेटकरी म्हणाले, मी लोकलमधून उतरल्यावर असाच धावतो!

Video: सगळ्यांच्या नादी लागा, गेंड्याच्या नाही, प्रवाशांच्या जीप मागे धावणाऱ्या गेंड्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.