Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | फटाके हातात घेऊन नाचणे अंगलट, माणसाच्या एका चुकीमुळे जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ थरारक आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक मजेत डान्स करताना दिसत आहेत. डान्स करुन हे लोक आपला आनंद व्यक्त करत आहेत. यावेळी एक माणूस आपल्या हातांमध्ये फटाके घेऊन डान्स करत असलेल्या लोकांकडे जात असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्याने दोन्ही हात वर केलेले असून त्याच्या हातात फटाके आहेत.

Video | फटाके हातात घेऊन नाचणे अंगलट, माणसाच्या एका चुकीमुळे जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा, व्हिडीओ व्हायरल
VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 4:20 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या माध्यमावर आपल्या हादरवून सोडणारे व्हिडीओ व्हायरल होतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ मात्र अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये फटाके फोडत असलेल्या माणसाच्या एका चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. (man doing stupidity with firecrackers video went viral on social media)

माणूस हातात फटाके घेऊन फिरतोय

व्हायरल होत असलेला व्हिडीओ थरारक आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक मजेत डान्स करताना दिसत आहेत. डान्स करुन हे लोक आपला आनंद व्यक्त करत आहेत. यावेळी एक माणूस आपल्या हातांमध्ये फटाके घेऊन डान्स करत असलेल्या लोकांकडे जात असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्याने दोन्ही हात वर केलेले असून त्याच्या हातात फटाके आहेत. तो चालत असताना फटाके वर हवेत जाऊन फुटत आहेत. हा सर्व प्रकार पाहून पुढे व्हिडीओमध्ये काहीतर अघटीत घडणार याची आपल्याला कल्पना येऊन जाते.

फटाके खाली पडले आणि घोळ झाला

व्हिडीओतील माणूस हातात फटाके घेऊन डान्स करणाऱ्या लोकांकडे गेलाय. हातात फटाके घेऊन लोकांमध्ये डान्स करण्याचा त्याचा इरादा असावा. मात्र, यावेळी एक विचित्र प्रकार घडला आहे. माणसाच्या हातातील सर्व फटाके अचानकपणे फुटले आहेत. फटाके फुटत असल्यामुळे सगळीकडे वादंग माजले आहे. तसेच या घटनेत माणसाच्या हातातील फटाक्यांचा बॉक्स खाली पडला आहे. नंतर मात्र सगळी धांदल उडाल्याचं आपल्याला दिसत आहे. चारही बाजून फटाके फुटत असून सगळीकडे हाहा:कार माजलाय. सगळे लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटले आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Insta Desi (@insta_desii)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी व्हिडीओला पाहून हसू आवरलेले नाही. तर काही लोकांनी असा वेडेपणा करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ insta_desii या इन्स्टाग्राम अकाऊंटर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

चालत्या रेल्वेत मॅनेजरची अमानुष मारहाण, माफीसाठी रेल्वे कर्मचाऱ्याच्या गयावया

दुधासाठी मांजरीने लावली लाडीगोडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटभरून हसाल

VIDEO | डॉगीने किचनमधून जेवण चोरण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल; तुम्हीही व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

(man doing stupidity with firecrackers video went viral on social media)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.