तुफान गर्दी असलेल्या ट्रेन मध्ये कसं चढायचं? डरने का नहीं, लड़ने का…
गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रो ट्रेनमध्ये शिरणाऱ्या एका व्यक्तीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई लोकल ट्रेनचे व्हिडिओ आपण नेहमी पाहतो, पण आता मुंबई मेट्रोचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईतील लोकल ट्रेनच्या गर्दीत चढणे सोपी गोष्ट आहे हे दाखवणारे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. परंतु आता एका नवीन व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केलंय. हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा नाही, तर मुंबई मेट्रोचा आहे. यात एका व्यक्तीने भर गर्दीत मेट्रोमध्ये कसं चढतात हे दाखवलंय.
गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रो ट्रेनमध्ये शिरणाऱ्या एका व्यक्तीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
12 सेकंदांची ही क्लिप @BabaJogeshwari या युझरने ट्विटरवर ‘मरोळ, 3 वर्षांपूर्वी’ असं कॅप्शन देत शेअर केली होती.
या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती मेट्रोच्या खचाखच भरलेल्या मेट्रो मध्ये स्वत:साठी जागा निर्माण करण्यासाठी धडपडताना दिसतोय.
Marol…3 years back. pic.twitter.com/1tW49JByzU
— Gina Kholkar (@BabaJogeshwari) October 17, 2022
मेट्रोमध्ये उपलब्ध असलेल्या कमी जागेत तो स्वत:ला ॲडजस्ट करताना दिसलाय. आधी तर तो प्रवासी गर्दी बघून बाहेर येतो. मग शक्कल लढवतो आणि खूपच स्मार्ट पद्धतीनं पुन्हा मेट्रोमध्ये जागा बनवत बनवत चढतो. गेट बंद होण्याच्या काही सेकंद आधी तो गर्दीत यशस्वीपणे मार्ग काढतो.
ही क्लिप तीन वर्ष जुनी असल्याची माहिती असून मुंबईच्या मरोळ नाका मेट्रो स्टेशनवर शूट करण्यात आली आहे. एका युझरने लिहिले की, “मुंबई मेट्रोचा प्रवास मुंबई लोकलपेक्षा वाईट होत चालला आहे.”
आणखी एका युझरने म्हटले की, “ॲडजस्टमेंट हा मुंबईतील आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.”