Viral | उंच डोंगरावर झोका खेळण्याचा प्रयत्न, मध्येच पायात दोरी गुंतली, पुढे जे झालं ते एकदा पाहाच

सध्या असाच एक अगदी मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झोका खेळताना एक मोठा अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Viral | उंच डोंगरावर झोका खेळण्याचा प्रयत्न, मध्येच पायात दोरी गुंतली, पुढे जे झालं ते एकदा पाहाच
swing-fall VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 3:51 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही मोजकेच असे व्हिडीओ असतात जे नेटकऱ्यांना चांगलेच आवडतात. प्राणी, पक्षी तसेच लोकांची झालेली फजिती ज्या व्हिडीओंमध्ये दाखवली जाते, ते  जास्त चर्चेत राहतात. सध्या असाच एक अगदी मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झोका खेळताना एक मोठा अपघात झाल्याचे दाखवण्यात आले असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Man falling from cliff while pushing swing video went viral on social media)

उंच डोंगरावर व्यक्ती खेळतोय झोका  

झोका खेळायला प्रत्येकालाच आवडते. मात्र, हाच खेळ कधीकधी आपल्या जीवावर बेतू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का ? सध्याच्या व्हायरल व्हिडीओ पाहून त्याची तुम्हाला प्रचिती येईल. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उंच डोंगरावर एका झोक्यावर बसला आहे. तर झोका खेळत असताना त्याला दुसरा एक व्यक्ती मदत करत आहे. याच मदत करणाऱ्या व्यक्तीसोबत मोठा अपघात झालाय.

पायामध्ये दोरी गुंतल्यामुळे झाला मोठा अपघात

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे झोका देणारा व्यक्ती हा झोक्यासोबतच फरफटत समोर गेला आहे. त्याचा पाय झोक्याला लटकत असलेल्या दोरीमध्ये गुंतल्याने हा प्रकार घडला. उंच डोंगरावर हा झोका आहे. पायामध्ये दोरी गुंतल्यामुळे हा माणूससुद्धा झोक्यासोबतच गेला आहे. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून कोणतीही अप्रिय घटना या ठिकाणी घडली नाही. झोक्याला लटकत असलेल्या दोरीमधून वेळीच पाय सुटल्यामुळे व्हिडीओतील व्यक्तीचा जीव वाचू शकलाय.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही लोकांना हा व्हिडीओ मजेशीर वाटत असून त्यांना हसू आवरलेलं नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | पेटलेला गॅस सिलिंडर घेऊन नदीकडे धाव, आग विझविण्यासाठी दाखवलेली हिम्मत एकदा पाहाच

Video | ड्रायव्हिंग करत असताना पठ्ठ्याच्या फोनवर गप्पा, पुढे जे झाले ते एकदा पाहाच !

Video | शराबी गाण्यावर तरुणाचा विचित्र डान्स, व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

(Man falling from cliff while pushing swing video went viral on social media)

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.