Video | शेवटच्या घटका मोजत असलेला पक्षी पाहिला अन् माणुसकी जिवंत झाली, पाहा हृदयद्रावक व्हिडीओ
व्हिडीओमध्ये एक स्विमिंग पूल दिसत आहे. या स्विमिंग पुलाच्या कडेला एक पक्षी पडला आहे. हा पक्षी शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसतेय.
मुंबई : अनेक लोकांना प्राणी तसेच पक्षी पाळण्याची आवड असते. घरात पाळलेला प्राणी तसेच पक्ष्याला हे लोक जिवाच्या पलिकडे जपत असतात. काहीजण तर पाळीव प्राण्याची घरातला सदस्य असल्याप्रमाणे काळजी घेतात. मात्र, काही लोक हे घरातील तसेच घराबाहेरच्या प्राण्यांचीसुद्धा सेवा सुश्रुशा करतात. असे लोक या जगात अनेक आहेत. सध्या तशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील माणसाची अनेकांनी वाहवा केली आहे. (man giving CPR to dying bird video goes viral on social media)
पक्ष्याला श्वास घेण्यास त्रास
व्हिडीओमध्ये एक स्विमिंग पूल दिसत आहे. या स्विमिंग पुलाच्या कडेला एक पक्षी पडला आहे. हा पक्षी शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसतेय. मात्र याच वेळी एक माणसू या पक्ष्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतोय. तो पक्ष्याच्या छातीला चोळतो आहे. तो जसाजसा पक्ष्याच्या छातीला चोळतो आहे. तसातसा हा पक्षी ओरडतो आहे. छातीला चोळल्यामुळे या पक्ष्यामध्ये प्राण परत येत असल्याचे दिसतेय.
पक्ष्याचे प्राण वाचवण्यासाठी माणसाकडून प्रयत्न
पुढे व्हिडीओतील माणूस हा पक्ष्याला आपल्या तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, एवढं सारं करुनही या पक्ष्याला काही फरक पडत नाहीये. हा पक्षी अजूनही उडू शकत नसल्याचे दिसतेय. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून या माणसाने एअर कंप्रेसरद्वारे पक्ष्याच्या तोंडात हवा फुंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, माणासाचा हा प्रयोग यशस्वी झाला. एअर कंप्रेसरमुळे हा पक्षी श्वास घ्यायला लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओतील पक्षी व्यवस्थित उठून बसल्याचं आपल्याला दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
Touching story of humane love to bring back life of a Kookaburra bird.. The bird in gratitude becomes his friend”George” Such a beautiful saga of love n care.@moefcc @ForestDeptt @pccfodisha @susantananda3 @ParveenKaswan pic.twitter.com/MoZio85qyJ
— Sandeep Tripathi, IFS (@sandeepifs) June 8, 2021
पक्षी आणि माणसाची मैत्री
विशेष म्हणजे हा पक्षी पूर्णपणे बरा झाल्यानंतर आता पक्षी आणि त्या माणसामध्ये मैत्री झाली आहे. या माणसाने पक्ष्याचे नाव जॉर्ज असे ठेवले आहे. आता हा पक्षी दररोज या माणसाच्या यार्डमध्ये येतो.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा आयएफएस संदीप त्रिपाठी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
इतर बातम्या :
अवघ्या एका महिन्यात मोडला रेकॉर्ड, दक्षिण आफ्रिकेतील महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म!
Baba ka Dhaba: कोरोनामुळे नवं रेस्टॉरंट बंद पडलं, कांता प्रसाद पुन्हा स्टॉलवर कामाला
Video : नवऱ्याची दाढी करताना अचानक कॅमेरा समोर, बायकोची धमाल उडवणारी अदा
(man giving CPR to dying bird video goes viral on social media)