देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्ताचा स्टंट!
हा माणूस हत्तीच्या मूर्ती खालून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
जेव्हा जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा देवासमोर नतमस्तक व्हायला विसरत नाहीत. काही लोक घंटी वाजवतात, तर काही तिथल्या मान्यतेनुसार दर्शन करण्यावर विश्वास ठेवतात. देवाच्या दर्शनानंतर लोकांचे मन एकदम शांत होते. एक मंदिरातला व्हिडीओ व्हायरल झालाय. ह्या व्हिडीओ मधील माणसाने देवांना प्रसन्न करण्यासाठी काहीतरी अद्वितीय आणि आव्हानात्मक करण्याचा प्रयत्न केलाय. पण या सगळ्यात त्याच माणसाला वाचवायची वेळ लोकांवर आलीये. गुजरातमधील एका मंदिरात हत्तीच्या पुतळ्याखाली हा भाविक अडकला.
ट्विटर युजर नितीनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा माणूस हत्तीच्या मूर्ती खालून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
व्हिडीओ जसजसा पुढे सरकतो तसतसे तुम्ही पाहू शकता की अनेक लोक त्या माणसाच्या मदतीसाठी एकत्र आले होते.
मूर्तीच्या खालून बाहेर पडण्यासही पुजारीसुद्धा त्या व्यक्तीला मदत करतात. मंदिराला भेट देणारे इतर अनेक भाविकही त्याला बाहेर काढण्यासाठी सूचना देतात.
भक्त बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहतो. तो आपले शरीरही फिरवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकही मदतीसाठी हात पुढे करतात, पण ती व्यक्ती पुतळ्याच्या आतच अडकून राहते.
Any kind of excessive bhakti is injurious to health ? pic.twitter.com/mqQ7IQwcij
— ηᎥ†Ꭵղ (@nkk_123) December 4, 2022
हा माणूस पुतळ्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला की नाही हे व्हिडिओतून स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत एक लाख 60 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.