Cat cute video : पाण्यात पडलेल्या मांजरीला वाचवलं; पाहा, काय Jugaad केलं?
Animal cute video : आपण आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे प्राणी (Animals) पाहतो. परंतु त्यापैकी काही मोजकेच प्राणी आहेत, ज्यांना आपण पाळतो. त्यात कुत्रे (Dogs) आणि मांजर (Cat) पहिल्या क्रमांकावर आहेत.
Animal cute video : आपण आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे प्राणी (Animals) पाहतो. परंतु त्यापैकी काही मोजकेच प्राणी आहेत, ज्यांना आपण पाळतो किंवा ते आपल्या जवळ राहावेत, असे आपल्याला वाटते. त्यात कुत्रे (Dogs) आणि मांजर (Cat) पहिल्या क्रमांकावर आहेत. असे म्हणतात की हे दोन प्राणी हजारो वर्षांपासून मानवाचे सोबती म्हणून जगले आहेत. कुत्रे हे तर सर्वात निष्ठावान प्राणी मानले जातात, तर मांजरी गोंडस प्राण्यांच्या श्रेणीत येतात. विशेषत: जर आपण मांजरींबद्दल बोललो तर कुत्र्यांप्रमाणे, त्यांना दिवसभर मजामस्ती करणेदेखील आवडते. कधी ती घरातील बेडवर उडी मारतात, तर कधी घरातल्या माणसांच्या अंगावर खेळतात. कधीकधी अशी उडी मारतात, की मग अडकतात. नुकतेच एका व्हायरल व्हिडिओमध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले. उडी मारताना एक मांजर पाण्यात पडते आणि तिला बाहेर काढण्यासाठी एक व्यक्ती मदत करते. काय जुगाड केले त्याने, त्याचा हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कौतुकास्पद
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मांजर पाण्यात पडली आहे आणि एक व्यक्ती तिला बाहेर काढण्यासाठी वरून एक कार्टून बॉक्स टाकते, ज्यामध्ये मांजर खालून वर येते. म्हणजेच पाण्यातून बाहेर पडते. त्या माणसाने तिला पाण्यातून बाहेर काढण्याचे मोठे काम केले. हा व्हिडिओ लोकांना खूपच आवडला आहे. संकटात सापडलेल्या माणसाला माणूस मदतही करत नाही, तर एका व्यक्तीने मांजरीसाठी इतके केले, असे लोकांना वाटत आहे. व्यक्तीची ही मदत कौतुकास्पद आहे.
ट्विटरवर शेअर
ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @buitengebieden_ या आयडीसह हा उत्तम व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 32 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 36 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि व्हिडिओला शानदार असे वर्णन केले आहे, तसेच मांजरीला मदत करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.
Helping a cat in need.. ? pic.twitter.com/lqLH5l2Lno
— Buitengebieden (@buitengebieden_) February 28, 2022