Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाईक चालवताना अडचण, मग काय बाईक खांद्यावर उचलून केला रस्ता पार, पाहा देसी बाहुबलीचा भन्नाट VIDEO

चंबामध्ये मुसळधार पाऊस आणि लँडस्लाइडमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशामध्ये बाईकसोबत अडकलेला एक व्यक्ती थेट बाईकच खांद्यावर उचलून रस्ता पार करताना दिसत आहे.

बाईक चालवताना अडचण, मग काय बाईक खांद्यावर उचलून केला रस्ता पार, पाहा देसी बाहुबलीचा भन्नाट VIDEO
खांद्यावर बाईक घेऊन चाललेला व्यक्ती
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 7:09 PM

चंबा : हिमाचल प्रदेशमधील  चंबा (Chamba) येथे मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. ठिकठिकाणी पाणी, चिखलं यामुळे रस्ते ब्लॉक झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर देखील असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तर अपघातही होत आहेत. पण या सर्वामध्ये रस्त्यावर बाईक चालवता येत नसल्याने बाईक थेट खांद्यावर घेऊन रस्ता पार करणाऱ्या ‘देसी बाहुबली’चा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

तुम्ही प्रसिद्ध चित्रपट ‘बाहुबली’ पाहिला असेल. त्यामध्ये एका सीनमध्ये हिरो एक मोठे शिवलिंग खांद्यावर घेऊन जाताना दिसतो. त्याचप्रमाणे चंबामध्ये देखील एक व्यक्ती आपली बाईक खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहे. याचे कारण तो जात असलेल्या रस्त्यावर पावसामुळे गाळ आणि चिखलं साठल्याने बाईक चालवण्यास अडचण येत असते. त्यामुळे तो बाईक खांद्यावर उचलून रस्ता पार करत आहे.

व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे आणि जिथून हा व्यक्ती जात आहे. त्याठिकाणाहून जरासा जरी पाय घसरला तरी थेट खोल दरीत तो व्यक्ती पडू शकतो.दरम्यान हा व्हिडीओ इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल होत आहे. नेटकरी फक्त व्हिडीओला शेअर करत नसून त्यावर विविध कमेंटही करत आहेत. यामध्ये काहीजण संबधित व्यक्तीच्या ताकदीची आणि हिमतीची दाद देत आहेत. तर काही अशाप्रकारे वागणे जीवघेणे ठरु शकते असंही म्हणत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO: भारतीय अमेरिकन व्यक्तीकडून कारवर कोट्यावधींच्या सोन्याचा मुलामा, आनंद महिंद्रा म्हणतात…

Video | तरुण रस्त्यावरच लागले क्रिकेट खेळायला, मध्येच दुचाकी आली अन् सगळं बिघडलं, मजेदार व्हिडीओ पाहाच

Video | साप-मुंगुसाची थऱारक झुंज, प्रवासीही श्वास रोखून पाहत राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

(Man in Chamba Crossing road with bike on his Shoulders Like Bahubali Video Went Viral)

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.