ज्या तिकीटावर 25 कोटींची लॉटरी जिंकली तेच तिकीट हरवलं…पुढे जे झालं ती जणू फिल्म कहाणी!

लॉटरीच्या तिकिटाची एक अतिशय फिल्मी कहाणी समोर आलीये. यामध्ये एका कार मेकॅनिकने 25 कोटींची लॉटरी जिंकली, मात्र या लॉटरीचे पैसे मिळण्याआधीच मोठा गदारोळ झाला. झालं असं की, यावर्षी जानेवारी महिन्यात या मेकॅनिकने लॉटरीची तिकिटे विकत घेतली.

ज्या तिकीटावर 25 कोटींची लॉटरी जिंकली तेच तिकीट हरवलं...पुढे जे झालं ती जणू फिल्म कहाणी!
Lottery ticket lost
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 12:14 PM

मुंबई: लॉटरीचे तिकीट जाहीर होताच लोक एका झटक्यात कोट्यधीश बनतात. पण अमेरिकेतील लॉटरीच्या तिकिटाची एक अतिशय फिल्मी कहाणी समोर आलीये. यामध्ये एका कार मेकॅनिकने 25 कोटींची लॉटरी जिंकली, मात्र या लॉटरीचे पैसे मिळण्याआधीच मोठा गदारोळ झाला. झालं असं की, यावर्षी जानेवारी महिन्यात या मेकॅनिकने लॉटरीची तिकिटे विकत घेतली.

पॉल लिटिल असे या मेकॅनिकचे नाव असून तो अमेरिकेतील मॅसेच्युसेट्सचा रहिवासी आहे. त्याने जानेवारीत तिकीट विकत घेतले होते, पण त्याचं भांडण झालं होतं. तिकीट काढून तो घरी परतत होता आणि वाटेत दारूच्या दुकानातच तो तिकीट विसरला होता. त्याचे तिकीट दारूच्या दुकानात राहिलंय याची त्याला जराही कल्पना नव्हती. विसरलेले तिकीट बघून दारूच्या दुकानात काम करणाऱ्या एका महिलेने हे तिकीट खिशात ठेवले.

नुकतेच या तिकिटाचा जॅकपॉट समोर आला असता मेकॅनिकने खरेदी केलेल्या तिकिटाची संख्या 25 कोटी रुपये मिळाल्याचे निदर्शनास आले. दुसरीकडे त्याचे नाव जाहीर करण्यात आले आणि येथे तिकिटाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. दारूच्या दुकानात तिकीट टाकल्याचं त्याला आठवलं आणि तो तिथेच विसरला. त्याने तिथे धाव घेतली, पण त्या महिलेने तसे काहीही घडले नसल्याचे सांगितले.

गंमत म्हणजे या महिलेने स्वत: लॉटरी ऑफिसमध्ये जाऊन हे 25 कोटी घेण्याचा प्रयत्न केला. महिलेने लॉटरी कार्यालयातील अधिकाऱ्यांना तिकीट दाखवले. जशी ती महिला तिकीट दाखवायला गेली त्या महिलेवर संशय आला, तिची चौकशी करण्यात आली. शेवटी तिकीट विकत घेणाऱ्या पॉल लिटिलचा शोध लागला आणि त्याला लॉटरीचे पैसे देण्यात आले. या महिलेवर फसवणुकीचा आरोप करून तुरुंगात डांबण्यात आले.

आणखी एका मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणाची सुनावणी सुरू असून पॉल लिटिल नावाच्या मेकॅनिकला हे पैसे मिळाले आहेत. तसेच तो अत्यंत गरीब मेकॅनिक असल्याचेही सांगण्यात आले. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.