विमानतळावरून चोरीला गेलेली सुटकेस, कसा पकडला गेला चोर? खूप हसाल
मिळालेल्या माहितीनुसार, बॅगेत सुमारे तीन लाख रुपयांचा माल होता. त्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली, पण चोर आवाक्याबाहेर होता. चोरटे विमानतळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले.
प्रवासादरम्यान चोरीच्या अनेक घटना घडतात. अमेरिकेच्या विमानतळावर एका बॅगची चोरी हा आजकाल चर्चेचा विषय बनलाय कारण विमानतळावरून एका व्यक्तीची बॅग गायब झाली आणि त्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने या बॅगचा मागोवा घेतला, तेव्हा त्या बॅगचे लोकेशन कळले. यानंतर जे घडलं ते प्रचंड व्हायरल झालं. चोर पकडला गेला, पण त्याच्या मजेशीर कृत्यामुळे तो चर्चेत आलाय.
खरं तर ही घटना अमेरिकेतील अटलांटा इथली आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, येथील हर्ट्सफिल्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमील नावाच्या व्यक्तीची बॅग गायब झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॅगेत सुमारे तीन लाख रुपयांचा माल होता. त्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली, पण चोर आवाक्याबाहेर होता. चोरटे विमानतळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले.
यानंतर त्या व्यक्तीने एक युक्ती आखली आणि ॲपल एअरटॅगच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली. सूटकेसमध्ये एअर टॅग ट्रॅकिंग डिव्हाइस बसवण्यात आले असून ते चोरापर्यंत पोहोचेल, असे त्यांनी सांगितले. यानंतर त्याचे लाईव्ह लोकेशन पोलिसांना देण्यात आले. काही वेळातच पोलिसांचे एक पथक चोरट्यापर्यंत पोहोचले.
पोलिस पथकाने त्या व्यक्तीला घेऊन सूटकेसचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर नेल्सन नावाच्या व्यक्तीजवळ ही बॅग सापडली. विशेष म्हणजे या चोरट्याने परिधान केलेले कपडे जमील यांचे होते. म्हणजेच चोरट्याने बॅगेतील कपडेही काढून घातले. ज्या व्यक्तीची बॅग चोरीला गेली होती त्याने चोराला सांगितले की, तू माझ्या सूटकेसमधून शर्ट आणि जीन्स काढून घातली आहेस. चोर घातलेल्या कपड्यामुळे पकडला गेला त्यामुळे ही घटना सध्या खूप चर्चेत आहे. सध्या त्या व्यक्तीची बॅग सापडली असून चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.