या व्यक्तीला 61 वर्षांपासून झोप नाही! असं काय झालं ज्याने झोप यायची बंद झाली?
पण या जगात सगळ्या गोष्टींना अपवाद आहे. हे जग विचित्र लोकांनी आणि त्यांच्या मजेदार गोष्टींनी भरलेलं आहे. व्हिएतनाममधील एक व्यक्ती आहे जो दावा करतो की तो 61 वर्षांपासून झोपलेला नाही.
असे म्हणतात की चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शांत झोप खूप महत्वाची आहे. असेही म्हटले जाते की, जर कोणी दोन-चार दिवस झोपली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होते. पण या जगात सगळ्या गोष्टींना अपवाद आहे. हे जग विचित्र लोकांनी आणि त्यांच्या मजेदार गोष्टींनी भरलेलं आहे. व्हिएतनाममधील एक व्यक्ती आहे जो दावा करतो की तो 61 वर्षांपासून झोपलेला नाही. व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या या सेलिब्रिटीचे नाव थाई एनजोक आहे. 80 वर्षीय एनजोक सांगतात की, लहानपणी एका रात्री त्यांना ताप आला होता आणि त्या रात्रीनंतर ते पुन्हा कधीच झोपू शकले नाहीत. जगातील ही पहिलीच अशी अनोखी घटना असू शकते. त्यांनाही इतरांप्रमाणे शांत झोप यावी, अशी मनापासून इच्छा आहे, पण त्यांनी असे काय केले की त्यांना झोप लागत नाही?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 1962 पासून त्यांची झोप कायमची गेली होती. गेली अनेक दशके त्यांची पत्नी, मुले, मित्र किंवा शेजाऱ्यांपैकी कोणीही त्यांना झोपलेले पाहिले नव्हते.
डॉक्टर या आजाराला निद्रानाश म्हणतात. ज्याचा रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. पण त्याचा त्यांच्या आरोग्यावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. ते आजही फिट वाटतात. सकाळी तासनतास चालतात आणि मेहनत घेतात. चांगला आहार घेतात.
ग्रीन टी पिण्याबरोबरच त्यांना वाइनचीही आवड आहे, पण आयुष्यात एकच कमतरता आहे ती म्हणजे त्याला इतरांप्रमाणे झोप येत नाही.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, कितीही काम केले तरी इतर लोकांपेक्षा त्यांना कमी थकवा जाणवतो. मात्र, जास्त मद्यपान केल्यावर ते 1-2 तास बेडवर किंवा सोफ्यावर पडून राहतात, पण तरीही त्यांना झोप येत नाही.