ऑर्डर केली पॉवर बँक, बॉक्स उघडल्यावर मिळाला विटेचा तुकडा, ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांकडून सोशल मीडियावर दु:ख व्यक्त
वस्तू खरेदी केल्यानंतर, तिची जेव्हा घरी डिलीव्हरी केली जाते, तेव्हा ग्राहकांना धक्का बसतो. कारण, जी वस्तू मागवली त्या वस्तूऐवजी दुसरीच वस्तू पाठवली जाते.
भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामाचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी फेस्टिव्ह सेल सुरु केले आहेत, ज्यात वस्तूंवर भरघोस सूट दिली जात आहे. या डिस्काऊंटचा फायदा मिळवण्यासाठी लोक या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर वेळ घालवत आहेत, आणि आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करत आहेत. बऱ्याचदा मौल्यवान वस्तूही ऑनलाईन मागवल्या जातात. मात्र वस्तू खरेदी केल्यानंतर, तिची जेव्हा घरी डिलीव्हरी केली जाते, तेव्हा ग्राहकांना धक्का बसतो. कारण, जी वस्तू मागवली त्या वस्तूऐवजी दुसरीच वस्तू पाठवली जाते. कॅमेरा खरेदी केला मिळाले पाईपचे तुकडे, मोबाईल खरेदी केला मिळाली साबनाची वडी, किंवा मिळाला विटेचा तुकडा. असे प्रसंग अनेक ग्राहकांसोबत होताना पाहायला मिळतात. ( Man orders power bank and gets brick piece people shared their opinion on online shopping )
सध्या याच फेस्टिव्ह सेलमध्ये काही लोकांना असेच अनुभव आले आहेत, जे अनुवभ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत, यातील बहुतांश गोष्टी या फ्लिपकार्टवरुन मागवण्यात आल्या होत्या.
ट्विटरवर @RahulSi27583070 नावाच्या युजरने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याने 2000 mAh ची पॉवरबँक मागवली होती, पण त्याला बॉक्स खोलल्यानंतर मिळाला विटेचा तुकडा, यानंतर, त्याने हे सगळं प्रकरण फ्लिपकार्टला टॅग करुन ट्विटरला टाकलं. या युजरचं हे एकटं प्रकरण नाही आहे, असा अनुभव अनेकांना आला आहे, जो त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.
Thanks @Flipkart @flipkartsupport for “brick piece” instead of 20000 mah power bank. Hatt off to #BigBillionDays #flipkart Order Id : OD123002100216739000 pic.twitter.com/zJiHv8bRP1
— Rahul Singh (@RahulSi27583070) October 4, 2021
मागवलं लायटर, आले नटबोल्ट
Flipkart Flipkart Karta Hai main lighter man gaya usmein se aap Hi Dekho Kya nikala pic.twitter.com/c2KC3wtHT6
— Arvind Mewada (@ArvindM81516288) October 5, 2021
इथं तर बॉक्सच रिकामा आला
Flipkart Fraud @Flipkart @flipkartsupport @FlipkartW @2GUD @FlipkartStories @FlipkartSellers @_Kalyan_K Please solve my problem I have ordered Truke buds when i unboxed it i got empty packet… Flipkart is a trusted company i not expect problem like this by flipkart pic.twitter.com/sT5kdzYIZa
— Yash Raj (@_modish_razzz_) October 5, 2021
एअर बर्डऐवजी डेटॉल ओरिजिनल
Wonderfull service by #Flipkart Recieved dettol soap instead of realme ear buds.#flipkart asked me to share docs, i sent them all docs, but still issue not resolved yet…#fake_Service pic.twitter.com/Shpw06w9cY
— Rajat Singal (@RajatSingal13) October 5, 2021
हेही वाचा:
पोरं असावीत तर अशी, चार भाऊ आपसात भिडले, कोर्टात लढले, कोण म्हणतं आई कुठं काय करते?
भूतांच्या अफवांनी आलिशान महालाची वाट, ब्रिटनमधला या महालाजवळ जाण्याची आजही कुणाची हिंमत नाही