Video | बापरे ! माणूस चक्क सापांसोबत खेळतोय, व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत !
सध्या तर एका माणसाचा चकित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसून चक्क अजगरांमध्ये बसला आहे. तो सापांमध्ये बसून मस्तपैकी खेळत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ व्हायरल होतात. तर काही व्हिडीओंची दिवसभर चर्चा होते. सध्या तर एका माणसाचा चकित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसू चक्क साप आणि अजगरांमध्ये बसला आहे. तो सापांमध्ये बसून मस्तपैकी खेळत आहे. (man plays with big snake video went viral on social media)
माणूस चक्क सापांसोबत खेळत आहे
हा व्हिडीओ पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत. कारण हा माणूस थेट सापांमध्ये बसला आहे. विशेष म्हणजे कसलीही भीती न बाळगता तो सापांसोबत मजेत खेळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे नाव झूकिपर जे ब्रेवर (Zookeeper Jay Brewer) असे आहे. झूकिपर इन्स्ट्राग्रामवर नेहमीच सक्रिय असतात. वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती देणारे तसेच त्यांच्यासोबत खेळतानाचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर ते शेअर करत असतात. हा व्हिडीओदेखील त्यांनी असाच शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेले काही व्हिडीओ आनंददायी असतात तर काही व्हिडीओंना पाहून आपल्याला भीती वाटते.
असे प्रयोग घरी करु नका
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ते सापांमध्ये बसलेले दिसत आहेत. “असे प्रयोग घरी करु नका. पण नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. प्राण्यांसोबत नेहमी मस्ती करावी,” असं त्यांनी म्हटलंय. तसेच हे काय होत आहे याची मला कल्पना नाही. पण मी माझी रात्र येथेच घालवणार आहे, असं मला वटतंय असंही झुकिपर म्हणत आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
दरम्यान, हा व्हिडीओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. तसेच काही लोक तर या व्हिडीओला शेअरदेखील करत आहेत.
इतर बातम्या :
Video | अंगाला फटाके बांधून स्टंटबाजी, पण मध्येच घोळ झाला, माणसासोबत नेमकं काय घडलं ?
Video | डोक्यावरुन ट्रॅक्टर जाऊनही सुरक्षित, एका हेल्मेटने वाचवलं, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
Bigg boss Marathi 3 | तृप्ती देसाई, कीर्तनकार शीवलीला पाटील ते उत्कर्ष शिंदे, बिग बॉस मराठीमधील 15 स्पर्धकांची पूर्ण यादीhttps://t.co/I1TKD9xtbc#BiggBoss | #BiggBossMarathi3 | #BiggbossMarathiseason3 |
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
(man plays with big snake video went viral on social media)