Video: ती ट्रेन चालवत स्टेशनपर्यंत पोहचली, तो ट्रेनसमोरच फुलांचा गुलदस्ता घेऊन उभा राहिला, अनोख्या प्रपोजचा व्हिडीओ व्हायरल

कॉनर ओ'सुलिव्हन आणि पॉला कार्बो झिया दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पॉला कार्बो झिया ही एक लोको पायलट आहे. पॉला कार्बो झियाला प्रपोज करण्यासाठी कॉनर ओ'सुलिव्हनने एक अनोखी पद्धत वापरली.

Video: ती ट्रेन चालवत स्टेशनपर्यंत पोहचली, तो ट्रेनसमोरच फुलांचा गुलदस्ता घेऊन उभा राहिला, अनोख्या प्रपोजचा व्हिडीओ व्हायरल
लोको पायलट असलेल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केलं
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 5:23 PM

आजपर्यंत तुम्ही प्रपोज करण्याचे अनेक मार्ग पाहिले असतील किंवा ऐकले असतील. अनेक वेळा लोक आपले प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करतात. हे सोशल मीडियापासून इतर प्लॅटफॉर्मवरही खूप गाजतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बराच जुना झाला असला तरी पुन्हा एकदा हा व्हिडिओ चर्चेत आहे. त्यामुळेच तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.( Man proposes to train driver girlfriend at railway station in dublin video viral)

हे प्रकरण आयर्लंडची राजधानी डब्लिनचे आहे. असं सांगितले जात आहे की, कॉनर ओ’सुलिव्हन आणि पॉला कार्बो झिया दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पॉला कार्बो झिया ही एक लोको पायलट आहे. पॉला कार्बो झियाला प्रपोज करण्यासाठी कॉनर ओ’सुलिव्हनने एक अनोखी पद्धत वापरली. व्हिडीओमध्ये दिसतं की, पॉला ही ट्रेन चालवत स्टेशनपर्यंत पोहचते, स्टेशनवर ट्रेन थांबवल्यानंतर तिला तिचा प्रियकर कॉर्नर बाहेर फुलांच्या गुच्छासह बाहेर उभा असल्याचं दिसतं. जशी पॉला बाहेर पडते, तसा कॉर्नर तिच्यासमोर गुडघे टेकतो आणि तिला फुलांचा गुलदस्ता आणि अंगठी देऊन प्रपोज करतो. आतापर्यंत 383 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील खूप आवडला आहे आणि युजर्स हा व्हिडिओ पसंत करत आहेत आणि शेअर करत आहेत, मग तुम्हीही हा व्हिडिओ पाहा, प्रपोज करण्याची ही पद्धत तुमच्या हृदयालाही स्पर्श करेल.

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट केली की, ‘काश कोणीतरी मला असं प्रपोज केले असतं’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘मला वाटत नाही की आजच्या काळात असे प्रेम असेल’ याशिवाय सोशल मीडिया युजर्स त्यांच्या लाईक आणि कमेंट्ससह व्हिडिओवर भरपूर प्रेम व्यक्त करत आहेत.

हेही वाचा:

Video: टाच मारली आणि बी पेरलं, शेतात अनोख्या पद्धतीने पेरणी करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video: जीव धोक्यात घालून हरणाच्या पाडसाला वाचवलं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

 

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.