आमचा, तुमचा सर्वांचा जीव आहे तितकाच महत्त्वाचा! जीव धोक्यात घालून जवानाने कुणाला वाचवलं? Viral Video

जीव कुणाचाही असो ते महत्त्वाचा. मग हा जीव प्राण्याचा असो किंवा माणसाचा, प्रत्येक जीवाला तितकंच महत्त्व आहे. जीव वाचवणारा सुद्धा हा विचार करत बसत नाही की जीव कुणाचा आहे. सध्या उत्तरेला अतिवृष्टीमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. अग्निशमन दलाचे जवान नेहमीप्रमाणे त्यांची ड्युटी पार पडतायत.

आमचा, तुमचा सर्वांचा जीव आहे तितकाच महत्त्वाचा! जीव धोक्यात घालून जवानाने कुणाला वाचवलं? Viral Video
dog life saved by fire fighter
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 1:53 PM

चंदीगड: कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत धावून येतात ती लोकं, ते जवान, ते पोलीस किंवा आणखी कोणीही कसलाही विचार न करता पटकन मदत करतात. जीव कुणाचाही असो ते महत्त्वाचा. मग हा जीव प्राण्याचा असो किंवा माणसाचा, प्रत्येक जीवाला तितकंच महत्त्व आहे. जीव वाचवणारा सुद्धा हा विचार करत बसत नाही की जीव कुणाचा आहे. सध्या उत्तरेला अतिवृष्टीमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. अग्निशमन दलाचे जवान नेहमीप्रमाणे त्यांची ड्युटी पार पडतायत. अशाच एका जवानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यात हा नेमका कुणाला वाचवतोय ते तर बघा, तुम्हालाही फार कौतुक वाटेल!

व्हिडीओत एका पुलावरून खाली शिडी जाताना दिसते, खाली पुराचं पाणी आहे. त्या पाण्याची पातळी वाढत चाललीये. पूरसदृश्य परिस्थिती दिसून येतेय. अशातच एक एक जीव किती महत्त्वाचा आहे नाही का? त्यात जे जीव वाचवत आहेत त्यांनीही कशाचाही विचार न करता जीव वाचवणं म्हणजे किती छान ना? हा व्हिडीओ बघा. ही घटना चंदीगडमधली आहे. चंदीगड पोलिसांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यात या अग्निशमन दलातील जवानाने एका कुत्र्याला वाचवलंय. पुरात अडकलेल्या या कुत्र्याला वाचवताना त्यांनी दाखवून दिलंय की प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, प्रत्येक जीव वाचवला जाईल!

हा व्हिडिओ चंदीगड पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. पूरसदृश्य परिस्थितीत अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी या व्यक्तीने आपला जीव धोक्यात घातला. त्याचे ऑनलाइन खूप कौतुक झाले. चंदीगड पोलिसांनी लिहिले, “चंदीगड पोलिसांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या पथकाचे अभिनंदन, खुदा लाहोर पुलाखाली अडकलेल्या पिल्लाला पुरात वाचवण्यात यश आले.” विशेष म्हणजे हे ट्विट #EveryoneIsImportantForUs, #LetsBringTheChange, #WeCareForYou अशा हॅशटॅगसह शेअर करण्यात आले आहे.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.