मेट्रोपेक्षा वेगात पळणारा माणूस, अहो खरंच! हा व्हायरल व्हिडीओ बघा
तुम्ही कधी मेट्रोपेक्षा फास्ट पळणारा माणूस पाहिलाय का? शक्यच नाही. माणूस पळून-पळून सुद्धा असा किती फास्ट पळेल ना? पण हा व्हिडीओ बघा या माणसाने खरोखर मेट्रोला मागे टाकलंय. हा इतक्या वेगात पळतोय की मेट्रो फास्ट आहे की हा माणूस हे कळणं कठीण जातंय. हा व्हायरल झालेला व्हिडीओ बघून तुम्हालाही धक्का बसेल.
मुंबई: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. कधी डान्सचा व्हिडीओ असतो, कधी गाण्याचा कधी प्रॅन्कचा तर कधी अजून कसला. जितके जास्त ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स तितके जास्त व्हिडीओ व्हायरल. व्हिडीओचा एखादाच असा प्रकार असेल जो व्हायरल होत नसेल. खरं तर या ऑनलाइन व्हिडीओमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोकं कळतात, त्यांचे गुण दिसून येतात. हे गुण आपल्याला देखील आश्चर्याचा धक्का देतात. आपल्यालाही व्हिडीओ बघून प्रश्न पडतो, “लोकं अशी पण असतात?”. सोशल मीडिया आपल्याला रोज नवे अनुभव देतो. हा व्हायरल झालेला व्हिडीओ बघून सुद्धा आपल्याला असाच धक्का बसतो.
मेट्रोला माणूस कसा मागे टाकू शकतो?
तुम्ही मेट्रो चे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. दिल्ली मेट्रोचे व्हिडीओ तर काय आपण नेहमीच बघतो. मेट्रो किती वेगात धावते, कशी असते हे सांगायची वेगळी गरज नाही. पण तुम्ही कधी मेट्रोपेक्षा फास्ट धावणारा माणूस पाहिलाय का? आता यावर तुम्ही म्हणाल, “हे कसं शक्य आहे? मेट्रोच इतक्या फास्ट धावते की त्या मेट्रोला माणूस कसा मागे टाकू शकतो?” पण हा व्हिडीओ बघा. हे खरंच घडतंय.
Algunas estaciones del metro de Londres son cortas… tan cortas que tardas menos corriendo (pero tienes que estar en forma)… pic.twitter.com/kllgQvnKO6
— Pepo Jiménez (@kurioso) March 13, 2017
व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये तुम्हाला फ्रेम दिसतील. एका फ्रेममध्ये तुम्हाला माणूस दिसेल आणि मेट्रो दिसेल तर दुसऱ्या फ्रेममध्ये तुम्हाला नुसताच पुढचा रस्ता दिसेल. या फ्रेमचा कॅमेरा माणसाने डोक्यावर लावलेला आहे त्यामुळे पुढचा रस्ता दिसतोय. जसजसा हा व्हिडीओ पुढे जातो तुम्हाला दिसेल हा माणूस किती वेगात धावतो. हा माणूस मेट्रो थांबली की दरवाज्यातून बाहेर पडतो आणि पळत सुटतो. हा माणूस पळत पुढच्या स्टेशनवर जातो. एक कॅमेरा या पळणाऱ्या माणसाच्या डोक्यावर आणि एक मेट्रो मध्ये फिट केलेला. शेवटी बघितल्यावर कळतं की हा माणूस खरंच मेट्रो पेक्षा फास्ट पळतोय, कारण मेट्रो आणि माणूस एकाच वेळी पुढच्या स्टेशनवर भेटतात. हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय.