VIDEO | जीवाची बाजी लावत त्याने महाकाय व्हेलला वाचवलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल
व्हेल माशाचे प्राण वाचतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. (whale fish video social media video)
मुंबई : सध्या सोशल मीडियाचे विश्व आहे. एका क्षणात लाखो गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यातही प्राण्यांचे, पशु-पक्षांचे व्हिडीओ जास्त प्रमाणात अपलोड केले जातात. यामध्ये काही व्हिडीओंमध्ये आश्चर्य असते तर काही व्हिडीओंमध्ये गोंडस प्राणी असतात. प्राण्यांविषयीच्या अनेक नवनव्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रमाणही बरेच आहे. मात्र व्हेल माशाचे प्राण वाचतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. (man save the life of whale fish video goes viral on social whale fish video)
आपण प्राण्यांची, पक्षांची शिकार करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. मात्र, कोणत्यातरी प्राण्याला जीवदान देतानाचा व्हिडीओ क्वचीतच तुम्ही पाहिला असेल. असाच एका व्हेल माशाला वाचवतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. व्हिडीओमध्ये पाहिलं तर त्या माणसाने आपल्या जीवाची बाजी लावून माशाच्या भोवती असलेला प्लास्टिकचा कचरा हटवल्याचे दिसते. हा व्हिडीओ एक पोलीस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी व्हिडीओसोबत अगदीच मार्मिकपणे लिहलं आहे. “माणूस हा पाण्यात राहत नाही. मात्र त्याने आपल्या सवयीने पाण्यातील जीवन संपवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. या जगात नुकसान करणारे कोटींनी भेटतील.
माणसाने अशा प्रकारे महाकाय व्हेल माशाला वाचवले, पाहा व्हिडीओ :
मनुष्य पानी मे नहीं रहते पर अपनी हरकतों से जल जीवन को तबाह करने में कोई कसर नहीं छोड़ी है. नुकसान पहुंचाने वालों की संख्या करोड़ों में है पर संरक्षण के लिए जूझने वाले मुट्ठीभर लोग ही हैं. सबने मिलकर प्रयास ना किये तो #MotherNature हमें #COVID19 से भी बड़ी सज़ा दे सकती हैं.#Karma pic.twitter.com/HEn5AFyQIS
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 11, 2021
मात्र, रक्षण करणारे या जगात मोजकेच आहेत. आता सर्वांनी मिळून आपण रक्षण करण्याचा प्रयत्न केला नाही तर #MotherNature आपल्याला भविष्यात #COVID19 पेक्षाही जास्त भयंकर शिक्षा देऊ शकते” असं काबरा यांनी व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, महाकाय व्हेलला वाचवतानाचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. या व्हिडीओला भरभरुन लाईक्स मिळत आहेत. तसेच व्हिडीओतील माणसाने जीव धोक्यात घालून व्हेलला रेस्क्यू केल्यामुळे त्याचे अभिनंदन केले जात आहे.
इतर बातम्या :
PHOTO | लेडी गागाचे कुत्रे महिलेने शोधले, साडेतीन कोटींचं बक्षीस मागताच नकार, कारण काय?
(man save the life of whale fish video goes viral on social whale fish video)