तहानलेली चिमणी, माणूस आला धावून !
ष्णता वाढली की माणसालाच नव्हे तर पशू-पक्ष्यांनाही खूप तहान लागते हे तुम्ही पाहिलं असेलच. अनेकदा असेही दिसून येते की, कडाक्याच्या उन्हात पशु-पक्ष्यांना तहान लागते, पण त्यांना पाणी मिळत नाही. अशा वेळी काही लोक त्यांच्यासाठी देवदूत बनून येतात.
गरजू व्यक्तीला मदत करणे हा प्रत्येक माणसाचा धर्म आहे आणि लोकांनी आपला धर्म कधीही विसरू नये. हीच खरी माणुसकी आहे. मात्र अशी माणुसकी हल्ली फार कमी लोकांमध्ये दिसून येते. उष्णता वाढली की माणसालाच नव्हे तर पशू-पक्ष्यांनाही खूप तहान लागते हे तुम्ही पाहिलं असेलच. अनेकदा असेही दिसून येते की, कडाक्याच्या उन्हात पशु-पक्ष्यांना तहान लागते, पण त्यांना पाणी मिळत नाही. अशा वेळी काही लोक त्यांच्यासाठी देवदूत बनून येतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने लोकांची मने जिंकली आहेत.
खरं तर या व्हिडिओमध्ये एक चिमणी तहान लागल्याने त्रस्त दिसत आहे. थोडा वेळ पाणी मिळाले नाही तर तिचा मृत्यू होईल असे वाटत होते. मात्र, तेवढ्यात एक सायकलस्वार तिथून जात होता, चिमणीला त्रास होताना पाहून त्याचंही मन दुखावलं. त्याने स्वत: बाटलीतून पाणी काढून पक्ष्याला दिलं. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पक्षी कसा रस्त्यावर बसला आहे आणि तहानलेला आहे आणि एक माणूस बाटलीच्या झाकणातून पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. तो वरून पक्ष्याच्या तोंडात थोडं पाणी टाकतो, मग पक्ष्याला थोडा आराम मिळतो.
“The smallest act of kindness is worth more than the greatest intention.” A cyclist saw a thirsty sparrow & shares his drinking water with the bird. Temperatures are rising. Please keep some water outside for the birds ? pic.twitter.com/bLQn7PHJta
— Susanta Nanda (@susantananda3) March 2, 2023
IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला. त्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडलाय. 30 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 58 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘पक्ष्यांसाठी दररोज पाणी ठेवणे हे मी आपले कर्तव्य समजतो, ज्यामध्ये आध्यात्मिक सुख मिळतं’, तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘दयाळूपणामुळे हे जग सुंदर बनते’.