Pushpa fever : 1-2 नाही तर चक्क पाच भाषांतलं Srivalli song! ऐका फक्त एका क्लिकवर…

Pushpa srivalli song in 5 languages : एका प्रतिभावान गायकाचा (Singer) एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्याची प्रतिभा पाहून आणि त्याचा आवाज ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

Pushpa fever : 1-2 नाही तर चक्क पाच भाषांतलं Srivalli song! ऐका फक्त एका क्लिकवर...
पाच भाषांमध्ये श्रीवल्ली गाणं गाणारा युवा गायक
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:25 AM

Pushpa srivalli song in 5 languages : या जगात कुशल लोकांची कमतरता नाही. लोक त्यांच्या कलेने संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित करतात. मात्र, आजच्या युगात सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे, जे कुशल माणसांची ओळख उलगडून दाखवत त्यांना नवी ओळख देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जगाला अशा कलाकारांची ओळख होऊ लागली आहे. एक काळ असा होता, की लोकांची कला मर्यादित राहत होती, कारण त्यांची कला संपूर्ण जगापर्यंत नेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे साधन नव्हते, परंतु आज सोशल मीडियामुळे हे काम खूप सोपे झाले आहे. एका प्रतिभावान गायकाचा (Singer) एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्याची प्रतिभा पाहून आणि त्याचा आवाज ऐकून तुम्ही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या सुंदर आवाजात पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणे गाताना दिसत आहे आणि तेही 1-2 नव्हे तर 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये.

ट्विटरवर शेअर

अशा कलाकाराला कुशल म्हणणार नाही तर दुसरं काय म्हणणार. लोक 1-2 भाषा शिकताना थकून जाता. अशावेळी या व्यक्तीने एकूण 5 भाषांमध्ये गाणी गाऊन सर्वांची मने जिंकली आहेत. तुम्हीही जेव्हा हे गाणे ऐकाल तेव्हा तुम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल, कारण त्या व्यक्तीने हे गाणे खूप सुंदर सजवले आहे आणि गायले आहे. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘#पुष्पाTheRise चित्रपटातील #श्रीवल्ली गाणे, 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये. प्रतिभावान गायकाची अप्रतिम कामगिरी. ऐकले पाहिजे’.

काहींना आवडले तेलुगू तर काहींना हिंदी व्हर्जन

2 मिनिटे 20 सेकंदांचा हा व्हिडिओ लोकांच्या यूझर्सना खूप आवडला आहे. याला आतापर्यंत 2 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना गाण्याचे तेलुगू व्हर्जन आवडले आहे तर काहींना हिंदी व्हर्जन आवडले आहे, पण काहीही म्हणा, गायकाने हे गाणे प्रत्येक भाषेत अतिशय सुंदर गायले आहे.

आणखी वाचा :

‘माणसानं माणसाशी माणुसकीनं वागलं पाहिजे’, ‘हे’ तीन मित्र कसा देतायत संदेश? पाहा Video

Kabristan wala restaurant : भारतातलं एक अजब रेस्टॉरंट, कुठे आहे? काय खास? पाहा ‘हा’ Viral video

Viral : ‘पापा की परी अंकल को ले उडी’, स्कूटर शिकणाऱ्या लाडलीनं काय केलं? पाहा Funny video

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.