Video | तंंदूर रोटी बनवताना घाणेरडेपणा, हॉटेलमधील कामगाराचा संतापजनक व्हिडीओ

तंदूर रोटी तयार करणारा माणूस रोटीवर चक्क थुकंतोय. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (man spitting on tandoori roti video)

Video | तंंदूर रोटी बनवताना घाणेरडेपणा, हॉटेलमधील कामगाराचा संतापजनक व्हिडीओ
तंदूर रोटी तयार करताना अशा प्रकारे एक माणूस रोटीवर थुंकतो आहे.
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 8:17 AM

नवी दिल्ली : प्रत्येकाला स्वच्छ आणि पौष्टिक अन्न खायला आवडतं. त्यासाठी अनेकजण भरपूर पैसे खर्च करतात. मात्र, आपल्याला जेवण देणाराच जर अन्नाशी छेडछाड करत असेल तर? तंदूर रोटी तयार करताना त्यावर थुंकण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. मेरठ, गाझियाबाद या ठिकाणी असे प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे आहे. मात्र, देशाची राजधानी म्हणजेच दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तंदूर रोटी तयार करणारा माणूस रोटीवर चक्क थुकंतोय. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तंदूर रोटीवर थुंकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (man spitting on tandoori roti in Delhi video goes viral)

तंदूर रोटीवर थुंकण्याचा प्रकार, सोशल मीडियावर संताप

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दिल्लीमधील ख्याला भागातील चांद हॉटेलमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये चांद हॉटेलमध्ये दोघे भट्टीवर तंदूर रोटी बनवत आहेत. मात्र, यावेळी यातील एकजण तंदूर रोटी तयार करुन झाल्यानंतर तिला भट्टीमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर थुकंतोय. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची तक्रार दिल्ली पोलिसांना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाराची गंभीरपणे दखल घेत हॉटेलमधील दोन्ही आरोपींना तब्यात घेतले.

दिल्लीमध्ये अशा प्रकारे एक माणूस तंदूर रोटीवर थुंकतोय, पाहा व्हिडीओ : 

तंदूर रोटीवर थुंकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद इब्राहिम आणि साबी अनवर अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी IPC च्या 269, 270, 273 कलमांतर्गत या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, प्राथमिक तपासादरम्यान बऱ्याच धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉटेलकडे अधिकृत परवाना मिळाला नसल्याचे समोर आले आहे. परवाना नसल्यामुळे हॉटेल मालकावरसुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तंदूरी रोटीवर थुंकण्याचा हा प्रकार समोर आल्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. अनेकांनी रोटीवर थुंकणाऱ्यांवर कठोर करावाई करण्याची मागणी केलीये.

इतर बातम्या :

Video | नियम मोडून महिला घराबाहेर पडली; कारवाई करताच शिवराळ भाषेचा वापर, पेटवून घेण्याचाही प्रयत्न

Video | बापरे ! केस कापण्यासाठी चक्क चाकू आणि हातोड्याचा वापर, व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO | लहान भाऊ चिडला, मोठ्या भावाने काय केलं?, जबाबदारी शिकवणारा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच !

(man spitting on tandoori roti in Delhi video goes viral)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.