Selfie च्या चक्कर मध्ये झाला सारा खेळखंडोबा, घरापासून 150 किलोमीटरवर पोहचले काका
या ट्रेनसोबत सेल्फी आणि फोटो काढण्याची क्रेझही जबरदस्त असल्याने अनेकदा प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना घडलीये.
फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारतचे आगमन झाल्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली. देशातील प्रत्येक नागरिकामध्ये याची क्रेझ दिसून येतेय. भारतीय रेल्वेसाठी ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीमध्ये एक नवे पर्व सुरू करणारी ही अनोखी ट्रेन आहे यात शंका नाही. या ट्रेनसोबत सेल्फी आणि फोटो काढण्याची क्रेझही जबरदस्त असल्याने अनेकदा प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना घडलीये.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना आंध्र प्रदेशातील राजमुंद्री स्टेशनची आहे. ट्रेन स्टेशनवर आल्यावर एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी ट्रेनमध्ये चढली आणि दुसऱ्याच क्षणी ट्रेनने वेग पकडला आणि ऑटोमॅटिक दरवाजा बंद झाला. त्याच्याकडून भाडे आकारण्यात आले आणि विजयवाडा येथे गाडी थांबल्यावर तो पुन्हा खाली उतरला तेव्हा कुठे या प्रवशाचा जीव भांड्यात पडला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती चालत्या ट्रेनचे गेट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान तो टीसीला त्याचे गेट उघडण्याची विनंती करताना दिसत आहे परंतु तिकीट चेकर त्यावर रिव्हर्स भाडे आकारतो. तिथे उपस्थित उर्वरित प्रवासी त्याच्यावर हसताना दिसत आहेत.
Welcome to East Godavari . Telugu Uncle got onto the Vande Bharat train in Rajamundry to take a picture and the automatic system locked the doors once the train started moving. ???
Loving the way the T.C. says “Now next is Vijayawada only” ???? pic.twitter.com/mblbX3hvgd
— Dr Kiran Kumar Karlapu (@scarysouthpaw) January 17, 2023
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले की, 16 जानेवारी रोजी राजमुंद्री रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन विशाखापट्टणमला जात होती. हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे, ज्यात सेल्फीच्या नादात एक प्रवासी ट्रेनमध्ये अडकला आहे.