AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिखलात घसरू नये म्हणून काढली चप्पल; पण घडलं भलतंच… हा Viral Video पाहा, हसतच राहाल!

सोशल मीडिया(Social Media)वर आपल्याला अनेक मजेदार व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात. सोशल मीडिया यूझर्सना असे मजेदार व्हिडिओदेखील सर्वाधिक आवडतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक मजेदार (Funny) व्हिडिओ घेऊन आलो आहोत

चिखलात घसरू नये म्हणून काढली चप्पल; पण घडलं भलतंच... हा Viral Video पाहा, हसतच राहाल!
पाण्यात बुडाली व्यक्ती
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 11:53 AM

सोशल मीडिया(Social Media)वर आपल्याला अनेक मजेदार व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात. सोशल मीडिया यूझर्सना असे मजेदार व्हिडिओदेखील सर्वाधिक आवडतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक मजेदार (Funny) व्हिडिओ घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ पाहून हसतच राहाल. सोशल मीडियावर असे हल्के फुलके व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. आपल्या ताणतणावाच्या, कामाच्या शेड्यूलमध्ये असे व्हिडिओ नक्कीच मदत करतात आणि आपल्याला हसवतात. तुम्हीही हा व्हिडिओ एन्जॉय कराल, याची आम्हाला खात्री आहे.

चप्पल काढतो

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नाला ओलांडताना दिसत आहे. यादरम्यान, असं काही घडतं, की तो थेट नाल्यात जातो. व्हिडिओतील व्यक्तीची नाल्यातली घटना पाहून तुम्हालाही हसू येईल. नाला ओलांडण्यासाठी एखादी व्यक्ती ज्या पद्धतीनं चप्पल काढून उडी मारते, ते खरोखरच खूप मजेशीर आहे.

वेगानं मारतो उडी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक तरुण नाल्याजवळ पोहोचतो. नाल्याजवळ पोहोचल्यावर चप्पल घातली, की चिखलात फसणार, हे त्याला समजतं. म्हणून तो आधीच चप्पल काढून हातात घेतो. यानंतर ती व्यक्ती नाला ओलांडण्यासाठी वेगानं उडी मारते. मात्र, उडी मारताच थेट नाल्यात बुडते. आता हा व्हिडिओ पाहू…

इन्स्टाग्रामवर शेअर

एका यूझरनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. व्हिडिओतील व्यक्तीची बुद्धिमत्ता पाहून तुम्हालाही हसू येईल. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 70 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून एका यूझरनं ‘छोटी गंगा बोलकर नाले में कुदा दिया.’ अशी कमेंट केली. त्याचवेळी, आणखी एका यूझरनं लिहिलं, की ‘सब पाप धुल गए.’

Viral : लग्नाआधी पाहा नववधूचा स्वॅग; Video पाहून यूझर्स म्हणतायत, किमान हेल्मेट तरी घालायला हवं होतं..!

Viral : गवंडीकाम करणारी युवती बनली एका प्रॉडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर, वाचा सविस्तर

Pandit Ji Rocks Dulha Shock : लग्नमंडपात वराला नव्हता धीर; मग पुजारी असं काही बोलले, की…

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.