आकाशात उडत्या विमानाचा दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न, प्रवाशांनी चोप चोप चोपला

जमिनीपासून हजारो फूट उंच उडणाऱ्या विमानात प्रवास करताना लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपमध्ये एका व्यक्तीने विचित्र वर्तन केले आणि मूर्खपणाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला इतर सहप्रवाशांनी चांगलाच चोप दिलाय.

आकाशात उडत्या विमानाचा दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न, प्रवाशांनी चोप चोप चोपला
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 3:36 PM

विमानात प्रवाशांना एका प्रवाशाला चांगलाच चोप दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विमानात बसलेली एक व्यक्ती हजारो फूट हवेत उडणाऱ्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे विमानात बसलेले बाकीचे लोक चांगलेच घाबरले. या व्हिडिओमध्ये इतर प्रवासी गेट उघडणाऱ्या व्यक्तीला पकडून चोप देताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी त्याच्या या कृत्याबद्दल टीका ही केली आहे. विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती विमानाचा इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला इतर प्रवाशी रोखत आहेत. 12 सेकंदाच्या या क्लिपमध्ये सुरक्षा कर्मचारी या व्यक्तीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशा कृत्यासाठी त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी, असे लोकं सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पनामा सिटीमध्ये हे विमान सुरक्षितपणे उतरले आहे. विमानाचे लँडिंग होताच या बेशिस्त प्रवाशाला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत बोलताना इतर प्रवाशांनी सांगितले की, क्रूची कृती अप्रतिम होती. त्यांच्यामुळेच आज आपण सर्व सुरक्षित आहोत.

दुसऱ्या एका प्रवाशाने म्हटले की, सांंगून देखील तो माणूस ऐकत नव्हता. त्याने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी त्याला अडवले, त्यानंतर तो सर्वांशी हाणामारी सुरू केली. यानंतर इतर प्रवाशांनी या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....