Video | नदी पार करण्यासाठी लढवली शक्कल, देशी जुगाड एकदा पाहाच !

नदीच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी एका माणसाने जबरदस्त जुगाड केले आहे. याच जुगाडाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Video | नदी पार करण्यासाठी लढवली शक्कल, देशी जुगाड एकदा पाहाच !
माणसाने अशा प्रकारे नदी पार केली.
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 9:08 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या पावसाचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत नदी कशी पार करायची हा प्रश्न अनेकांना पडतो. याच पार्श्वभूमीवर नदीच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी एका माणसाने जबरदस्त जुगाड केले आहे. याच जुगाडाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (man used special technique to cross the river video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अगदीच विशेष आहे. या व्हिडीओमध्ये नदी पार करण्यासाठी एका माणसाने लावलेली शक्कल तुम्हाला आश्चर्यात पाडणारी आहे. व्हिडीओमध्ये एक नदी दिसतेय. या नदीमध्ये पाणी ओसंडून वाहत आहे. पाण्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी नदीवर कोणताही पूल नाही.

लाकडी आसनावर बसून नदी केली पार

पूल नसल्यामुळे व्हिडीओतील माणसाने जबरदस्त डोकं लावलं आहे. त्याने नदीच्या दोन्ही काठांवर दोन दोऱ्या बांधल्या आहेत. या दोऱ्यांवर त्याने एक लाकडी आसन ठेवले आहे. याच आसनावर बसून एखाद्या गाडीप्रमाणे तो आरामात नदीच्या दुसऱ्या काठावर जात आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. तसेच काही लोकांना माणसाच्या या डोकॅलिटीचे नवल वाटले आहे. गरज ही शोधाची जननी म्हटल्याप्रमाणे नदीच्या दुसऱ्या बाजूला जाण्याची गरज असल्यामुळे माणसाने हा अविष्कार करुन दाखवला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक करत असून शेअर आणि कमेंट्ससुद्धा करत आहे. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ Rupin Sharma IPS यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

इतर बातम्या :

Video | कसलीही चिंता न करता कारमध्ये ठाण मांडले, डेअरिंगबाज अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | पाखरालाही आत येण्यास परवानगी नसलेल्या संसदेत उंदराचा धुडगूस, स्पेनच्या खासदारांची तारांबळ

Video | डिजेचा आवाज ऐकताच झोपडीवर चढला, केला मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

(man used special technique to cross the river video went viral on social media)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.