विमान उडवायचं होतं, आता विमानातच कायमचा राहतो! स्वप्न पूर्ण करावं ते असं
अशाच एका व्यक्तीची कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे, ज्यांनी लहानपणी हे स्वप्न पाहिले होते. पण तरुणपणी जेव्हा त्यांनी आपलं घर बांधलं.
एखाद्या व्यक्तीच्या लहानपणापासूनचं जर स्वप्न असेल की तो एक दिवस विमान उडवेल. हे स्वप्न त्याच्या तरुणपणापर्यंत पूर्ण झाले नाही तर त्याच्या मनात खूप खंत असेल. हो ना? मग अशा वेळी माणूस आपले स्वप्न पूर्ण करण्यामागे लागतो. अशाच एका व्यक्तीची कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे, ज्यांनी लहानपणी हे स्वप्न पाहिले होते. पण तरुणपणी जेव्हा त्यांनी आपलं घर बांधलं, तेव्हा ते त्यांनी विमानासारखं बनवलं. आता ते फक्त विमान उडवत नाहीत तर ते त्यात राहतात सुद्धा.
खरं तर ही कहाणी एका अशा माणसाची आहे जी व्यवसायाने मजूर आहे. क्रॅक पोव असे या व्यक्तीचे नाव असून तो कंबोडियाचा रहिवासी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने विमानासारखे दिसणारे आपले ड्रीम हाऊस बनवले आहे.
त्या माणसाने हे घर स्वत: बांधले आहे. यात दोन बेडरूम आणि दोन बाथरूम आहेत. विशेष म्हणजे ही व्यक्ती स्वत: मिस्त्री म्हणून काम करते.
आणखी एका मीडिया रिपोर्टनुसार, या घराची किंमत जवळपास वीस हजार डॉलर म्हणजेच जवळपास 17 लाख रुपये झाली आहे. ती व्यक्ती म्हणते की मला या घरात राहून खूप आनंद मिळतो कारण ते खऱ्या विमानासारखे वाटते. जेव्हा मी आत जातो तेव्हा असे वाटते की मी विमानात राहत आहे.
त्याने स्वत: या घराच्या बांधकामाची कहाणी सांगितली. तो सांगतो की त्याने हे घर बांधले कारण त्याला विमान उडवायचे होते परंतु त्याला वाटले की तो आपले स्वप्न पूर्ण करू शकणार नाही, म्हणून त्याने असे घर बांधले. सध्या हे घर पाहण्यासाठी अनेक जण तिथे येतात.