Video: ‘माणिके मागे हिते’चं असं व्हर्जन तुम्ही ऐकलं नसेल, चिमुरडीच्या रॅपिंग कौशल्याचं भरभरुन कौतुक
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सर्वजण या मुलाचे कौतुक करत आहेत. यूजर्सदेखील मुलीच्या रॅपिंग कौशल्याची जोरदार प्रशंसा करत आहेत.
सध्या माणिक मागे हिते गाण्याने इंटरनेटवर बरीच चर्चा निर्माण केली आहे आणि हे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे यात शंका नाही. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते सामान्य माणसापर्यंत सगळेच त्यावर रिल्स बनवताना दिसतात. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरपासून सगळेच या गाण्यात मग्न झालेले दिसतात. हे गाणं इतकं व्हायरल झालंय की कुणीतरी रील बनवताना दिसत आहे.त्यातच आता एका मुलीने हे गाणे वेगळ्या पद्धतीने गाऊन लोकांची वाहवाही मिळवली आहे. (Manike mage Hithe Viral video of little girl who sang mage hithe Rap people will love this video)
सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतलेली ही क्लिप थोडी वेगळी आहे, कारण ती बाकीच्यांपेक्षा थोडी वेगळी होती. सर्वोत्कृष्ट गाणे गाताना एका लहान मुलीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि आता तो नेटिझन्सची मनं जिंकत आहे. या मुलीचे स्वर इतके मधुर आहेत की, ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटेल.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सर्वजण या मुलाचे कौतुक करत आहेत. यूजर्सदेखील मुलीच्या रॅपिंग कौशल्याची जोरदार प्रशंसा करत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम यूजर सरथ चंद्रनने इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. इथं निष्पाप मुलीच्या गायनाची स्तुती करताना लोक या व्हिडिओला अप्रतिम म्हणत आहेत.
माणिके मागे हितेचं बासरी व्हर्जन पाहा
View this post on Instagram
‘माणिक माझे हिते’ हे सतीश रत्ननायक यांचं गाणे आहे. पण हे गाणं योहानी डी सिल्वाने गायलं आहे. या गाण्याचे बोल Dulan ARX यांनी लिहिले आहेत.आतापर्यंत या गाण्याला 170 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही पाहा:
साप चावला म्हणून थेट सापालाच जिवंत पकडून डॉक्टरांसमोर आणलं, डॉक्टरांचीही भांबेरी!
Video: डोक्यावर पुष्पवृष्टी अन् डोळ्यात पाणी, पोलीस अधिकाऱ्याच्या निरोपाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल!