Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनातून कळा निघाल्या भावा..’; Calm Down गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का? नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण त्यावर थिरकताना दिसतायत. आता या गाण्याचं एक नवीन व्हर्जन नेटकऱ्यांच्या भेटीला आलं आहे. 'Calm Down' गाण्याचा हा मराठी रिमेक आहे.

'मनातून कळा निघाल्या भावा..'; Calm Down गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का? नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
Calm Down Marathi VersionImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 11:47 AM

मुंबई : जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर ‘Calm Down’ हे गाणं नक्कीच ऐकलं असणार. या गाण्यावर इन्स्टाग्रामवर अनेकजण रिल्स बनवत आहेत. तर काहींनी त्यावर डान्ससुद्धा केला आहे. नायजेरियन गायकाचं हे गाणं जगभरात तुफान हिट ठरतंय. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण त्यावर थिरकताना दिसतायत. आता या गाण्याचं एक नवीन व्हर्जन नेटकऱ्यांच्या भेटीला आलं आहे. ‘Calm Down’ गाण्याचा हा मराठी रिमेक आहे. ‘रिकामटेकड्या लोकांचं हक्काचं गाणं’ या कॅप्शनसह हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजतंय.

सुशिक्षित बेरोजगार ही संकल्पना तुम्ही ऐकलीच असणार. आजवर आंदोलनं, मोर्चे, निषेध अशा पर्यायांचा वापर करून ही समस्या सरकारसमोर मांडण्यात आली. मात्र एका भन्नाट गाण्याच्या माध्यमातून बेरोजगारांचा हंबरडा पहिल्यांदाच ऐकायला मिळतोय. देशातील अनेक तरुणांच्या हाती सध्या डिग्री तर आहे, पण काम मात्र नाही. अशा तरुणांचं दु:ख उपरोधिक पद्धतीने यात मांडण्यात आलंय.

Calm Down चा मराठी रिमेक

हे सुद्धा वाचा

हा मराठी रिमेक खास रे टीव्हीच्या युट्यूब आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ‘लॉकडाऊनच्या मास फायरिंगच्यानंतर बऱ्याच तरूणांना त्याचा चटका बसला. रिकामटेकडी केविलवाणी पोरं घरात बसून हंबरडा फोडू लागली की आमच्याकडे डिग्री आहे आम्ही सुशिक्षित आहोत, कुणीतरी आम्हाला काम द्या. पण आज त्यांच्या हाताला काम नाहीये. कित्येक तरुण आज सरकारकडे नोकरीसाठी हंबरडा फोडत आहेत पण त्यांना काम मिळत नाहीये. हाच बेरोजगारांचा हंबरडा आम्ही Calm Down या गाण्याच्या चालीवरच्या ‘काम द्या’ या गाण्यातून तुमच्यासमोर मांडत आहोत,’ असं कॅप्शन या गाण्याला दिलं आहे.

या गाण्यावर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. ‘गमतीशीर वाटत असलं तरी विषय काळजीचा आहे’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘कडू सत्य आहे भावा, पण तरी सगळे विचारतात काय काम करतो? कीती पगार आहे? गरीबाची चेष्टा करतात. विषय हार्ड घेतला भावा,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. सत्य परिस्थिती लोकांपुढे आणल्याबद्दल आपले आभार, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

रेमा या नायजेरियन गायक आणि रॅपरने ‘Calm Down’ हे मूळ गाणं गायलं आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेलं हे गाणं सोशल मीडियावर तुफान हिट ठरतंय. रेमा हा 22 वर्षांचा असून या गाण्यासाठी त्याला विविध पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. रेमाचं मूळ नाव डिव्हाइन इकुबॉर असं आहे.

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.