Video: बंदुक घेऊन दरोडा टाकण्यासाठी आत शिरले, पण एका मरिन कमांडोच्या शौर्यापुढं सगळं फोल ठरलं
अमेरिकेतून एक घटना उघडकीस आली आहे, जिथे दोन चोर चोरी करण्यासाठी दुकानात घुसले. मात्र तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने एवढी जबरदस्त चपळाई दाखवली की दोन्ही चोरट्यांना पळ काढावा लागला.
सोशल मीडियाच्या जगात बरेच व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ असे आहेत की, ते वेगवेगळ्या कारणांनी लोकांचे लक्ष वेधून घेतात. आज पुन्हा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमेरिकेतून एक घटना उघडकीस आली आहे, जिथे दोन चोर चोरी करण्यासाठी दुकानात घुसले. मात्र तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने एवढी जबरदस्त चपळाई दाखवली की दोन्ही चोरट्यांना पळ काढावा लागला. (Marine Corps vet disarms gun wielding robbery suspect at store)
या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, दोन्ही चोर दुकानाचा दरवाजा उघडून आत शिरतात,आणि त्यांनी बंदूक दाखवली. पण तेवढ्यात दुकानाच्या आत उभ्या असलेल्या व्यक्तीने चोरांची बंदूक पकडली आणि वेगाने ती दुसरीकडे वळवली. हे पाहून मागून आलेला चोर लगेच तिथून पळून जातो. जो बंदुकीसह आत शिरतो, त्याला हा व्यक्ती जागेवरच पाडतो. इथंच हा व्हिडीओ संपतो.
व्हिडीओ पाहा-
एका अहवालानुसार, ज्या व्यक्तीने चोरांची योजना उध्वस्त केली त्याचं नाव जेम्स क्लिसर आहे. त्यांनी अमेरिकन मरीनमध्ये सेवेत काम केलं आहे. तिथं मिळालेल्या स्पेशल ट्रेनिंगमुळे त्यांनी तात्काळ कारवाई तर केलीच पण चोराकडून त्याची बंदूक हिसकावून घेतली. आता याच घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
ही घटना अमेरिकेतील अॅरिझोनाची आहे. इथं असलेल्या एका दुकानात दोन चोरटे हातात बंदुका घेऊन दरोडा टाकण्यासाठी घुसल्याची माहिती आहे. हे दुकान गॅस स्टेशनजवळ आहे, त्यापैकी एकाकडे बंदूक आहे तर दुसरा त्याच्या मागे डोकावून जातो. दोन्ही चोर मास्क घातलेले दिसतात. या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.
हेही पाहा: