आपण सर्वांनी जत्रेत ‘मौत का कुआं’ (Maut Ka Kuan) पाहिला असेल. मृत्यूच्या या विहिरीत स्टंटमॅन बाइक किंवा कारनं स्टंट करताना आपण पाहतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ‘मौत का कुआं’ पाहायला खूप मजा येते. ती अत्यंत धोकादायक असली तरी.. यात थोडीशी चूक झाल्यास स्टंटमॅन थेट विहिरीत पडून गंभीर जखमी होऊ शकतो. याशिवाय त्यांच्यावर मृत्यूचा धोकाही नेहमीच असतो.
‘मौत का कुआं’सारखं चॅलेंज
सोशल मीडिया(Social Media)वर ‘मौत का कुआं’ चॅलेंजचे व्हिडिओ पाहायला मिळाला. आता या व्हिडिओमध्ये कोणताही स्टंटमॅन बाइक किंवा कारनं स्टंट करताना दिसत नाही, तर दोन-तीन लोक पायांनी स्टंट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हे एक प्रकारचं चॅलेंज आहे, यामध्ये ‘मौत का कुआं’सारखी बनलेली जागा दिसते. यामध्ये खालून धावत वरच्या दिशेनं जावं लागतं आणि वरून खालपर्यंत यावं लागतं.
‘अशाच गतीची गरज’
व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्ती हे धोकादायक चॅलेंज पूर्ण करताना दिसतेय. याशिवाय दोन मुलीही हे आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की तो व्यक्ती आपल्या दोन मित्रांसह एका ठिकाणी उभा आहे. तो ‘मौत का कुआं’सारख्या आकारात तळापासून वरपर्यंत धावू लागतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की ती व्यक्ती अगदी ‘मौत का कुआं’मधल्या एखाद्या स्टंटमॅनसारखी त्यामध्ये धावत आहे. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, की ‘जीवनात अशाच गतीची गरज आहे.’पाहा हा व्हिडिओ…
Need this momentum in life ?
@ Amazing Physics pic.twitter.com/5huxim1a1r
— Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) January 4, 2022
थोडा तोल बिघडला तर…
‘मौत का कुआं’मध्ये स्टंट करणं खूप कठीण काम आहे. त्यासाठी वेगासोबतच योग्य संतुलन आवश्यक आहे. अन्यथा छोटीशी चूक स्टंटमॅनची हाडं मोडू शकतो. थोडासाही तोल बिघडला तर खाली पडण्याची शक्यता खूप वाढते.