टी-शर्टवर #Panauti चा मॅसेज; भारताच्या T-20 मधील विजयानंतर MBA चहावाल्याला तुम्ही पण कराल सॅल्यूट
MBA Chaiwala Panauti : टी20 विश्वचषकामध्ये MBA चहावाला प्रफुल्ल बिल्लोरे हा सोशल मीडियावर चर्चेत राहिला. तो सोशल मीडियावर पनौती मीम्ससाठी प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे त्याने यावेळी भारताला नाही तर दक्षिण आफ्रिकेला पाठिंबा दिला होता.
टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला 7 धावांनी धूळ चारली. टी20 क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. बारबाडोस येथील मैदानावर हा सामना रोमहर्षक ठरला. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या हातात होता. भारतीय खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन करत सामना खेचून आणला. दक्षिण आफ्रिका संघाला पराभावाचा सामना करावा लागला. रोहित शर्माच्या संघाने एकही सामना न हारता विश्वचषक नावावर केला.
MBA Chaiwala चर्चेत
टी20 विश्वचषकाच्या संपूर्ण मालिकेत MBA Chaiwala प्रफुल्ल बिल्लोरे हा कायम चर्चेत होता. तो समाज माध्यमांवर पनौती मीम्ससाठी लोकप्रिय आहे. अर्थात हे एक प्रकारचं दुषणच आहे. त्याने याच कारणामुळे भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेला पाठिंबा दिला. ज्यामुळे भारत विजयी होवो आणि दक्षिण आफ्रिका संघ पराभूत होवो, अशी त्याची इच्छा होती. ज्यावेळी बिल्लोरे हा दक्षिण आफ्रिका संघाला पाठिंबा देत होता, त्यावेळी भारतीय प्रेक्षकांनी त्याला प्रोत्साहन दिले. तो खरा देशभक्त असल्याचे सांगितले.
For one and only India 🇮🇳❤️🔥 😢 pic.twitter.com/0BAP1anHl1
— Prafull Billore (@pbillore141) June 29, 2024
#Panauti सोशल मीडियावर ट्रेंड
भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर त्याच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तो भारताच्या विजयामुळे भावनिक झाल्याचे दिसले. त्याने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले. तो या व्हिडिओत एक पांढरा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. त्यावर लिहिलेले आहे, ‘पनौती, हेट हे एक नवीन प्रेम आहे.’ भारताच्या विजयानंतर आज रविवारी पनौती हा शब्द समाज माध्यमांवर ट्रेंड करत आहे.
— Prafull Billore (@pbillore141) June 29, 2024
का म्हटले जाते पनौती?
प्रफुल्ल याला समाज माध्यमावर अनेक जणांनी पनौती असे टोपणनाव दिले आहे. त्याने गेल्या काही दिवसांत ज्याच्या सोबत छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केली, त्याच्यासोबत काही ना काही वाईट घडले आहे. खासकरुन क्रिकेटमध्ये प्रफुल्ल याने ज्या संघाला पाठिंबा दिला. त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अर्थात हा एक समज आहे आणि तो दृढ झाला आहे.
भारत जिंकण्यासाठी स्वतः झाला ट्रोल
भारत जिंकण्यासाठी प्रफुल्ल बिल्लोरे हा स्वतः अनेकदा ट्रोल झाला. टीम इंडिया जिंकावी म्हणून त्याने उपांत्यपूर्व सामान्यात इंग्लंड संघासोबतचा त्याचा फोटो शेअर केला होता. या सामन्यात भारताने इंग्लंड हरवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. त्याने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला पाठिंबा दिला आणि भारताने टी20 विश्वचषक रोमहर्षकपणे जिंकला.