एक चूक McDonald’s ला पडली महागात, ग्राहकाला द्यावे लागले 5 कोटी!
मुलांना काही स्नॅक्स खायचे असतील तर ते लगेचच मॅकडोनाल्डमध्ये पोहोचतात. तुम्हालाही बर्गर आवडतं का हे? मग आधी थांबून ही बातमी वाचा, नाहीतर नंतर तुम्हालाही पश्चाताप होईल. होय, एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे
लंडन: तुम्हालाही मॅकडोनाल्ड्स बर्गर खायला आवडतात का? मुलांना काही स्नॅक्स खायचे असतील तर ते लगेचच मॅकडोनाल्डमध्ये पोहोचतात. तुम्हालाही बर्गर आवडतं का हे? मग आधी थांबून ही बातमी वाचा, नाहीतर नंतर तुम्हालाही पश्चाताप होईल. होय, एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. लंडनमधील मॅकडोनाल्ड्सच्या आउटलेटमध्ये एक ग्राहक बर्गर खरेदी करण्यासाठी गेला होता, तेथे त्याला उंदराच्या विष्ठेसह बर्गर देण्यात आला. त्या व्यक्तीने उंदराची विष्ठा पाहताच याबाबत तक्रार केली. आता या प्रकरणात तक्रारीनंतर मॅकडोनाल्ड्सला 5 मिलियन युरो म्हणजेच 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे.
एका ग्राहकाने बर्गरमध्ये ही घाण दिसल्यानंतर त्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, नंतर आरोग्य निरीक्षकांना मॅकडोनाल्डचे आउटलेट उंदरांनी भरल्याचे समजले. यापूर्वी 2021 मध्ये पूर्व लंडनमधील लेटनस्टोन मध्ये अशीच एक घटना घडली होती. येथील मॅकडोनाल्ड्स ड्राइव्ह-थ्रूमधून एका ग्राहकाने चीज बर्गर खरेदी केल्यानंतर रेस्टॉरंटच्या अन्न स्वच्छतेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा महिलेने बर्गर खाल्ले तेव्हा जेवणाच्या रॅपरमध्ये उंदराचे अवशेष पाहून ती अवाक झाली.
कंपनीला ग्राहकाला 5 कोटी रुपयांचा दंड भरावा लागला
मॅकडोनाल्डमध्ये मिळणारे अन्न कोणत्या आधारावर तयार केले जाते, याची तपासणी फूड इन्स्पेक्टर दररोज करत असतात. अनियमितता आढळल्यास कंपनी मोठा दंड आकारते आणि आउटलेट बंद करण्याचे आदेशही देते. भारतातील अनेक मॅकडोनाल्ड्स आउटलेट्समध्ये अशी घटना घडली असली तरी लंडनमध्ये हे प्रकरण खूप मोठे झाले, ज्यामुळे मॅकडोनाल्ड्सला 5 कोटी रुपयांचा दंड भरावा लागला. मॅकडोनाल्डच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीने आपल्या ईस्ट लंडन आउटलेटमधील स्वच्छतेच्या परिस्थितीबद्दल माफी मागितली आहे. आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेचे उच्च मानक राखण्यासाठी मॅकडॉनल्ड प्रयत्न करते, परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत, असेही ते म्हणाले.