Video : ईsss McDonald’s मधून मागवलेल्या कोल्ड ड्रिंकमध्ये निघाली पाल, किळसवाना व्हीडिओ व्हायरल…

सोशल मीडियावर कोल्ड ड्रिंकचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. भार्गव जोशी या व्यक्तीने हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केलाय. याला त्याने माझ्यासोबत मॅकडोनाल्डमध्ये काय घडलं पाहा, असं कॅप्शन दिलं आहे.

Video : ईsss McDonald’s मधून मागवलेल्या कोल्ड ड्रिंकमध्ये निघाली पाल, किळसवाना व्हीडिओ व्हायरल...
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 2:10 PM

मुंबई : एखाद्या कॅफेमध्ये गेल्यास आपण आवडीने कोल्ड ड्रिंक मागवतो. पण काहीवेळा त्यात झुरळ, पाल निघाल्याच्या घटना घडतात. आसाही अशीच एक घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये सोला येथील मॅकडोनाल्डमध्ये (McDonald’s) ही घटना घडली आहे. भार्गव जोशी (Bhargav Joshi) या व्यक्तीने मॅकडोनाल्डमध्ये कोल्ड ड्रिंक मागवलं. यात त्याला पाल आढळली. याचा व्हीडिओ त्याने ट्विटरवर पोस्ट केला. भार्गव जोशी आणि त्यांच्या मित्रांनी आरोप केला आहे की, “आम्ही या मॅकडोनाल्डमध्ये गेलो होतो. तिथे कोल्ड ड्रिंक मागवल्यानंतर त्यात पाल निघाली. आम्ही त्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण कुणीही आमची तक्रार एकून घेत नव्हतं. आम्ही तिथेच चार तासांपेक्षा जास्त वेळ बसून होतो. त्यांनी मला 300 रुपये परत करण्याची ऑफर दिली. पण ते योग्य नव्हतं. कोल्ड ड्रिंकमध्ये पाल निघणं अयोग्यच आहे.”

अहमदाबादमध्ये सोला येथील मॅकडोनाल्डमध्ये ही घटना घडली आहे. भार्गव जोशी या व्यक्तीने मॅकडोनाल्डमध्ये कोल्ड ड्रिंक मागवलं. यात त्याला पाल आढळली. याचा व्हीडिओ त्याने ट्विटरवर पोस्ट केला. त्यानंतर अहमदाबाद महानगरपालिकेने अॅक्शन घेतली. सोला येथील मॅकडोनाल्डचे आउटलेट सील केलं आहे. भार्गव जोशी यांच्या तक्रारीची दखल घेत अहमदाबाद महानगरपालिकेचे अन्न सुरक्षा अधिकारी देवांग पटेल यांनी या कोल्ड ड्रिंकचा नमुना घेतला. अहमदाबाद येथील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत चाचणीसाठी दिला सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी तात्काळ प्रभावाने रेस्टॉरंट सील केलं.

सोशल मीडियावर कोल्ड ड्रिंकचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. भार्गव जोशी या व्यक्तीने हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केलाय. याला त्याने माझ्यासोबत मॅकडोनाल्डमध्ये काय घडलं पाहा, असं कॅप्शन दिलं आहे. याला दीड हजारांहून अधिक लोकांनी पाहिलंय आणि अनेकांनी असं होणं टूक असल्याचं म्हटलंय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.