मुंबई: काल महाराष्ट्रातल्या राजकारणातला (Mahrashtra Politics) सगळ्यात मोठा दिवस होता. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राजकारणातली गणितं बदलली. बरं मग आता सगळ्यांना वाटलं आता भाजप आणि शिंदे गटात युती होईल आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील. पण फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या जनतेवर बॉम्ब टाकला. मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बसणार अशी घोषणा करण्यात आली. आधी तर फडणवीसांनी सांगताना मी कुठलंही पद न घेता जनतेचा सेवक असेल आणि सरकारला पाठिंबा देईल असं सांगितलं पण केंद्रातून आदेश आले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. काल या या दोन्ही पदांसाठीचा शपथविधी पार पडला! या दरम्यान लोकं मात्र गोंधळून गेले, काहींनी समर्थन केलं काहींनी विरोध! देवेंद्र फडणवीसांची वाह वाह झाली, त्यांचा चाहतावर्ग मात्र नाराज झालाय. सोशल मीडियावर (Social Media) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यावर मिम्सचा पाऊस झाला, भन्नाट मिम्स शेअर करण्यात आले…कुणी म्हणतोय हा तर फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, कुणी म्हणतंय अरेच्चा ही तर गुगली! चला बघुयात नवे कोरे करकरीत मिम्स…