महिने किंवा वर्षे नाही, तर काही मिनिटांत उभारा तुमचं घर; कसं? पाहा ‘हा’ Viral Video

Wonderful house video : जेव्हा कोणी कमावायला सुरुवात करतो, तेव्हा तो प्रथम त्याचे घर (Home) घेण्याचे स्वप्न (Dream) पाहतो आणि विचार करतो की आपल्या कुटुंबासह (Family) तेथे शिफ्ट व्हावे. आम्ही तुम्हाला असे घर दाखवतो, जे तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो.

महिने किंवा वर्षे नाही, तर काही मिनिटांत उभारा तुमचं घर; कसं? पाहा 'हा' Viral Video
काही मिनिटांत उभं राहणारं घर
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 3:49 PM

Wonderful house video : जेव्हा कोणी कमावायला सुरुवात करतो, तेव्हा तो प्रथम त्याचे घर (Home) घेण्याचे स्वप्न (Dream) पाहतो आणि विचार करतो की आपल्या कुटुंबासह (Family) तेथे शिफ्ट व्हावे. घर किंवा फ्लॅट घेण्यासाठी माणसाला लाखो आणि करोडो रुपये जमवावे लागतात आणि कोणतेही घर तयार व्हायला महिने आणि वर्षे लागतात. लोक खूप मेहनत करून घर तयार करतात आणि त्यात राहतात. कधी कधी कोणत्याही व्यक्तीच्या तीन ते चार पिढ्या तिथे राहतात. मात्र कमी वेळात होणारे घर पाहिले आहे का? चला आम्ही तुम्हाला असे घर दाखवतो, जे तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो. होय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे दिसून येते की एक मोठा आणि उंच कंटेनर त्याच्या दुप्पट आकाराचा बनविला गेला होता आणि तो स्वतःच्या आकारानुसार दुमडला आणि उलगडला जाऊ शकतो. हे कॉम्पॅक्ट साइड हाउस पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

अगदी काही सेकंदांत…

कंटेनर बॉक्सच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एक फोल्ड करण्यायोग्य खोली बनवण्यात आली आहे, जी काही सेकंदात उघडून दोन खोल्या बनवता येतात. तुम्हाला हवे तेव्हा उलगडूनही तुम्ही ते बंद करू शकता. तुम्हाला अगदी फ्लॅटसारखा दिसणार आहे. कंटेनरदेखील आजूबाजूला हलविला जाऊ शकतो. खोलीच्या आतील दृश्य देखील खूप सुंदर आहे. त्यात खिडक्या, दरवाजे, दिवे, सर्वकाही आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर गॅजेटग्राउंड नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना या घराची जणू भुरळच पडली आहे. एवढेच नाही, तर लोक ते खरेदी करण्याच्या मूडमध्ये दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका यूझरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, की आम्ही हे घर कोठून खरेदी करू शकतो. त्याचवेळी, काही लोक विचारत आहेत, की ते कसे बनवले आणि ते कोठून खरेदी करता येईल.

View this post on Instagram

A post shared by Gadget Round (@gadgetround)

आणखी वाचा : 

#PulwamaAttack : देश विसरणार नाही तुमचं बलिदान! पुलवामात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

‘कलेजा ठंडा हो गया’, 54 Chinese Appsवर भारत सरकारनं बंदी घातल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस

मै लिंक नही खोलूंगा…! नागपूर पोलिसांच्या क्रीएटीव्हीटीला तोड नाय, पुष्पाचा फोटो शेअर करत काय म्हणाले बघा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.