Video: ‘मेरे प्यारे साथियो’ म्हणत कॉमेडियन श्याम रंगिलाकडून मोदींची भन्नाट मिमिक्री, व्हिडीओ तुफान व्हायरल

कॉमेडियन श्याम रंगीला यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काहींच तासांत या व्हिडीओला 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

Video: 'मेरे प्यारे साथियो' म्हणत कॉमेडियन श्याम रंगिलाकडून मोदींची भन्नाट मिमिक्री, व्हिडीओ तुफान व्हायरल
श्याम रंगीला याचा नवा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:00 PM

देशातील अनेक प्रसिद्ध नेत्यांची नक्कल करून लोकप्रिय झालेल्या कॉमेडियन श्याम रंगीला यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काहींच तासांत या व्हिडीओला 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडीओत श्याम रंगीला यांनी पीएम मोदींची मिमिक्री करताना लोकांना खूप हसवलं आहे. त्यांनी आपल्या यूट्युब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो लोकांना खूप आवडत आहे. म्हणूनच अनेकांनी हा व्हिडीओ डाऊनलोड करुन आपल्या पर्सनल अकांऊटवर आणि व्हॉट्सअपवरही शेअर केला आहे. ( Mimicry of Prime Minister Modi by famous comedian Shyam Rangeela. Comedy video on student exams and PM Modi’s US tour)

या व्हिडीओमध्ये श्याम रंगीला पीएमच्या शैलीत म्हणतात, परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेदना मला चांगल्या प्रकारे समजतात. कारण कोरोना नंतर, तुम्ही ज्या प्रकारे परीक्षेची वाट पाहिली, त्याच प्रकारे मी परदेश दौऱ्यावर जाण्याची वाट पाहिली. माझ्या प्रिय मित्रांनो, फक्त आपणच हे समजू शकतो, पण प्रतीक्षेचं फळ खरोखरच गोड असतं हे आपण सर्वांनी हे ऐकलं आहे आणि म्हणूनच मला वाटतं की, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही ते जगाला दाखवू.

व्हिडिओ पाहा :

यानंतर, रंगीला म्हणतो, जेव्हा परीक्षेची वेळ येते, तेव्हा आपण परीक्षेला जाण्याच्या वाटेतही परीक्षेची तयारी करतो. मोदी दौऱ्यातील विमानत बसलेला फोटो इथं त्याने शेअर केला आहे. पुढे रंगीला म्हणतो, होय ही एक वेगळी गोष्ट आहे की कधीकधी कुणाचा फोटोही हेडलाईन्समध्ये येतो. पण हे आवश्यक नाही की आपला अनुभव आपल्या अपेक्षांनुसार असावा. त्यामुळे तुमची व्यथा मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपण घाबरून जाण्याची गरज नाही. जग आपल्याला जे काही प्रश्न विचारेल, त्याचं योग्य उत्तर दिलं पाहिजे.

श्याम रंगीलाचा हा व्हिडिओ वेगाने लोकांमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरतो आहे. मोदींचा अमेरिका दौरा, त्याची करण्यात आलेली जाहिरात यावर रंगीलाने ब्लॅक कॉमेडी केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना श्यामने लिहिले की, परीक्षा आणि अमेरिका दौरा हे खूप वेगळे विषय आहेत, ते या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारे दिसू नयेत. बघा आणि तुम्हाला कसे वाटले ते सांगा. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओवर अनेक मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.

हेही पाहा:

Video: ‘स्प्लेंडर’चा ‘ब्लेंडर’ म्हणून वापर, भुईमूग मुळापासून वेगळा करण्यासाठी बळीराजाचा अनोखा जुगाड

Video: वडिलांनी वाहतुकीचा नियम मोडला, आणि मुलगी चिडली, सूरत पोलिसांकडून अनोखा व्हिडीओ शेअर

 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.