video| मिनी हेलिकॉप्टरचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणतात लवकरच सुटणार वाहतूक कोंडीचा प्रश्न

एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हेलिकॉप्टरसारखे दिसणारे मात्र त्यापेक्षा छोटे असलेले उपकरण हवेत उडताना दिसत आहे. या उपकरणामध्ये एक जण बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून भविष्यात वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

video| मिनी हेलिकॉप्टरचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणतात लवकरच सुटणार वाहतूक कोंडीचा प्रश्न
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:40 PM

विज्ञानाने (Science) आज प्रचंड प्रगती केली आहे. एक काळ असा होता की, लोकांनी तेव्हा विचार देखील केला नसेल की आपण हवेत उडू शकतो. मात्र काळ बदलत गेला. पुढे तत्रज्ञानाच्या अविष्काराने विमान आणि हेलिकॉप्टरचा शोध लागला. ज्याच्या मदतीने मानवाने आकाशात भरारी (Soaring in the sky) घेतली. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, मानव चंद्रावर देखील जाऊन आला. मानव नेहमीच आपले काम सोपे होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेत असतो. ज्या गोष्टींच्या मदतीने तो आपले काम सोपे करत असतो. सध्या सोशल मीडियावर (social media) असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हेलिकॉप्टरसारखे दिसणारे मात्र त्यापेक्षा छोटे असलेले उपकरण हवेत उडताना दिसत आहे. या उपकरणामध्ये एक जण बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून भविष्यात वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हेलिकॉप्टरसारखे दिसणारे एक उपकरण आहे. ज्याला चारही बाजूंनी छोटे पंखे बसवले आहेत आणि ते हेलिकॉप्टरप्रमाणे हवेत उडते. त्यामध्ये एक व्यक्ती बसलेली आहे आणि ही व्यक्ती ते उपकरण हवेत उडवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, हे मिनी हेलिकॉप्टर नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उरतले आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. या उपकरणामुळे भविष्यात ट्राफिक जामची समस्या दूर होऊ शकते, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

लाईक आणि कमेंटचा पाऊस

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला असून, त्यांनी कॅप्शनमध्ये एक मजेदार प्रश्न विचारला आहे. भविष्यात अशा उपकरणामध्ये बसून कोणाला ऑफीसला जायला आवडेल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. दोन मिनिटे आणि 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

मिनी हेलिकॉप्टरचा व्हिडीओ

संबंधित बातम्या

धक्कादायक! विद्यार्थांना खाऊ घातला स्पर्म मिश्रीत केक; शिक्षिकेला 41 वर्षांचा तुरुंगवास

सोनम गुप्तानंतर आता राशी बेवफा; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

थरकाप उडवणारा व्हिडीओ! इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील बाल्कनीला लटकून व्यायाम, नेटकरी म्हणतात…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.