VIDEO: माकड आणि मांजराची अशी अनोखी मैत्री तुम्ही कधीही पाहिली नसेल, पाहा खास व्हिडीओ!
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जवळपास सर्वांनाच प्राणी (Animals) आवडतात. विशेष म्हणजे कुत्री, मांजर हे पाळले देखील जातात, इतकेच नव्हेतर काही लोक घोडे, माकड आणि हत्ती देखील पाळतात. मात्र, भारतामध्ये मांजर पाळणे शुभ मानले जात नाही. परदेशामध्ये बरेच लोक मांजर (Cat) पाळतात.
मुंबई : लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जवळपास सर्वांनाच प्राणी (Animals) आवडतात. विशेष म्हणजे कुत्री, मांजर हे पाळले देखील जातात, इतकेच नव्हेतर काही लोक घोडे, माकड आणि हत्ती देखील पाळतात. मात्र, भारतामध्ये मांजर पाळणे शुभ मानले जात नाही. परदेशामध्ये बरेच लोक मांजर (Cat) पाळतात. बऱ्याच वेळा मांजरीचे अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र ,सध्या माकड आणि मांजराच्या अनोख्या मैत्रीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतो आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला आर्श्चयाचा धक्का नक्कीच बसेल.
माकडाचा आणि मांजराचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक खोडकर माकड आणि एक मांजर आहे. माकड मांजराचे दात कसे मोजण्याचा प्रयत्न करत आहे हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. मग थोड्या वेळाने मांजरीने त्याला अशा प्रकारे मारले की बिचारे माकड जमिनीवर पडले. मात्र परत मांजर त्याला उचलते आणि माकडाची आणि मांजरीची मस्त मस्ती सुरू आहे. हा व्हिडीओ संपूर्ण बघितल्यानंतर आपल्या नक्कीच लक्षात येईल की, माकड आणि मांजरीमध्ये किती जास्त मैत्री आहे.
इथे पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ
View this post on Instagram
हा मजेदार व्हिडिओ monkeyloversklub या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 7 लाख 55 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 20 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर कमेंट देखील केल्या आहेत. काहींनी माकडाला किंग काँग आणि मांजराला ‘कॅटझिला’ म्हटले आहे, तर काही युजर्सचे म्हणणे आहे की, या दोघांमध्ये खूप जास्त मैत्री आहे आणि दोघेही मस्तीच्या मूडमध्ये आहेत.
संबंधित बातम्या :
Video : परदेशी ‘गंगुबाई’, व्हीडिओ एकदा बघाच, बघताक्षणी डान्सरच्या प्रेमात पडाल… गॅरेंटी!
Video : काळजाचं पाणी करणारा व्हीडिओ, उंचीवरून हॉट बलून कोसळलं, 24 सेकंदाचा व्हीडिओ पाहा…